Video : काबुलमधील हॉटेलजवळ बॉम्बस्फोट; तीन अतिरेक्यांचा खात्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan kabul bomb blast

Video : काबुलमधील हॉटेलजवळ बॉम्बस्फोट; तीन अतिरेक्यांचा खात्मा

काबुल, अफगाणिस्तानः अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका हॉटेलजवळ स्फोट झाल्याची घटना घडली आहे. शिवाय गोळीबाराचा प्रकारदेखील घडलाय.

या घटनेमध्ये दोघे जण जखमी झालेले आहेत.त्याशिवाय इतर जीवितहानी झालेली नाही. मात्र हल्लेखोर तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं.

हेही वाचाः सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह यांनी ट्विट करुन सांगितलं की, काबुलमधील एका हॉटेलजवळ हल्ला झाला. यातील तिनही अतिरेकी मारले गेले आहेत. हॉटेलमध्ये असलेल्या सगळ्या नागरिाकंना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. केवळ दोन परदेशी नागरीक जखमी झालेले आहेत. तेही त्यांनी इमारतीवरुन उड्या घेतल्या म्हणून.

हेही वाचा: Chitra Wagh : सुप्रिया सुळेंसह अनेकांच्या ताफ्यात 'निर्भया'च्या गाड्या; वाघ यांचा गौप्यस्फोट

दरम्यान, ज्या हॉटेलजवळ हा स्फोट झाला त्या हॉटेलमध्ये चीनी व्यापारी आणि नागरिक वास्तव्याला होते. त्यामुळे चीननेदेखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.

टॅग्स :bomb blastKabul