esakal | ...अन् पत्रकाराला नाक घासायला लावले
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban

...अन् पत्रकाराला नाक घासायला लावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल : तालिबानच्या राजवटीत अनागोंदी माजली असून अफगाणिस्तानच्या नागरिकांत असंतोष वाढत चालला आहे. ठिकठिकाणी आंदोलन केले जात असताना त्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना देखील तालिबानकडून वाईट वागणूक दिली जात आहे.

आजच्या महिला आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराने म्हटले की, तालिबानने माझे ओळखपत्र आणि कॅमेरा हिसकावला. त्यांनी मला लाथा घातल्या. याशिवाय तालिबानने एका अफगाण पत्रकाराला देखील पकडले. पण त्याला सोडून दिले. तत्पूर्वी त्याला जमीनीवर नाक घासण्याची शिक्षा दिली. तसेच या आंदोलनाचे वार्तांकन केले म्हणून माफी मागण्यास भाग पाडले. अफगाणिस्तानात पत्रकारांना काम करणे कठीण झाले आहे.

हेही वाचा: 'या' ई-मेल शिष्टाचाराचे करा पालन! व्यक्तिमत्त्वाचा वाढेल प्रभाव

‘टोलो’ चॅनेलने म्हटले की, त्यांचा कॅमेरामन वाहिद अहमदीला तालिबानने अटक केली होती. जर्मनीचे चॅनेल ‘डॉइच वेली ने म्हटले की, तालिबानचे दहशतवादी घरोघरी जाऊन पत्रकारांना शोधत आहेत. ते केवळ पत्रकारांवर गोळ्या झाडत नाही तर त्यांच्या कुटुंबीयांचा देखील बळी घेत आहेत. अनेक पत्रकारांना तालिबानने मारहाणही केली आहे. आम्हाला दहशतवादी म्हणू नका, असा तालिबानचा आग्रह आहे.

loading image
go to top