'मृतात्म्यासह निघाले!' देश सोडणाऱ्या अफगाणी फोटोग्राफरचं हृदयद्रावक ट्विट

'मृतात्म्यासह निघाले!' देश सोडणाऱ्या अफगाणी फोटोग्राफरचं हृदयद्रावक ट्विट

काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तिथली परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. तालिबान ही दहशतवादी संघटना अनेक प्रकारचे निर्बंध लादणारी संघटना असल्याने तिथल्या व्यवस्थेत मोकळेपणाने श्वास घेणं अशक्य आहे. खासकरुन, ज्या व्यक्ती कलाक्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी अफगाणिस्तानमध्ये राहणं अवघड आहे. तालिबानने याआधीच शरिया कायद्यानुसार, संगीत, चित्रपट इत्यादी कलाप्रकारांवर बंदी घातली होती. त्यातल्या त्यात, अफगाणी महिलांना तालिबानी राजवटीत मोकळा श्वास घेता येणारच नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच अनेक कलाकार अफगाणिस्तानमधून पळ काढून सुरक्षित जागी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. अफगाणी चित्रपट निर्मात्या आणि छायाचित्रकार रोया हैदरी यांनी देखील देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. देश सोडून जात असताना त्यांच्या मनातील भावना त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या आहेत.

'मृतात्म्यासह निघाले!' देश सोडणाऱ्या अफगाणी फोटोग्राफरचं हृदयद्रावक ट्विट
काबूल बॉम्ब स्फोटाची सूचना तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती!

त्यांनी म्हटलंय की, माझा आवाज सतत उठवण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य आणि घर सोडलं. आता पुन्हा एकदा मी माझ्या मातृभूमीपासून पळून जात आहे. पुन्हा एकदा, मी शुन्यापासून सुरुवात करत आहे. मी माझ्यासोबत फक्त माझे कॅमेरा आणि एक मृतात्मा घेऊन एका महासागरापलिकडे निघाली आहे. मातृभूमी, पुन्हा आपली भेट होईपर्यंत, जड अंत:करणासह मी तुझा निरोप घेते. त्यांनी या पोस्टसोबत जो फोटो ट्विटरमध्ये जोडला आहे, तो देखील खूपच बोलका आहे. त्या फोटोमधून अफगाणिस्तानमधील भीषण परिस्थितीची सहज कल्पना येते. रोया या फोटोग्राफरच्या चेहऱ्यावरचे भेदरलेले भाव मास्कमधूनही सहजगत्या दिसून येतात. तिच्यासह कुंपणापलिकडे अनेकजण सुटकेसाठी विमानाची वाट पाहत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय.

'मृतात्म्यासह निघाले!' देश सोडणाऱ्या अफगाणी फोटोग्राफरचं हृदयद्रावक ट्विट
काबुल एअरपोर्टवर पाणी बॉटल 3000, तर राईस प्लेट 7500 रूपये

याआधी अफगाणिस्तानवर तालिबाने आपली सत्ता १९९६ ते २००१ या काळामध्ये प्रस्थापित केली होती. हा सत्ताकाळ अफगाणिस्तानच्या राजवटीतील काळा काळ म्हणून ओळखला जातो. तसाच काळ पुन्हा एकदा अनुभवयला मिळत आहे. तालिबानी राजवटीत महिलांना स्वातंत्र्य मिळत नाही. इतकंच काय, पुरुषांनाही बऱ्याच धार्मिक बंधनाखाली वावरावं लागतं. या सगळ्या क्रूर परिस्थितीची पूर्वकल्पना असल्यानेच अनेक लोक हा देश सोडून निघाले आहेत. या देशात कलाकारांना कसलेच स्थान नसणारे, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच रोया यांच्यासारख्या फोटोग्राफर्सवर ही वेळ आली आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, रोया यांना देश सोडण्यात यश मिळालं असून काही दिवसांपूर्वीच त्या फ्रान्सला पोहचल्या आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com