esakal | अफगाणिस्तान : तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा; मोहम्मद अखुंद बनले पंतप्रधान
sakal

बोलून बातमी शोधा

taliban_leadership

तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा; मोहम्मद अखुंद बनले पंतप्रधान

sakal_logo
By
अमित उजागरे

काबूल : अफगाणिस्तानावर कब्ज्यानंतर तालिबानने अखेर आज (दि.०७) आपल्या नव्या सरकारची घोषणा केली. यामध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे पंतप्रधान असतील. त्याचबरोबर मुल्ला बरादर उपपंतप्रधान, सिराजुद्दीन हक्कानी कार्यकारी गृहमंत्री, मुल्ला याकूब संरक्षण मंत्री तर अमीर मुत्तकी यांच्यावर परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

जाणून घ्या तालिबानच्या मंत्रिमंडळात कोण असेल?

माहिती मंत्री - खैरउल्लाह खैरव्वा, न्याय मंत्री - अब्दुल हकीम, उपपरराष्ट्र मंत्री शेर अब्बास स्टानिकझाई तर जबिउल्लाह मुजाहिद यांच्यावर माहिती मंत्रालयात उप मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याद्वारे तालिबानने आपल्या सरकारची घोषणा केली असून लवकरच या मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे.

loading image
go to top