
Afghanistan Taliban forces launch heavy attacks across the Durand Line, capturing multiple Pakistani military outposts in Kunar and Helmand provinces.
Summary
1️⃣ अफगाणिस्तान–पाकिस्तान सीमेवर भीषण संघर्ष सुरू झाला आहे.
2️⃣ तालिबान सैन्याने कुनार आणि हेलमंडमधील अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.
3️⃣ या लढाईत किमान १२ पाकिस्तानी सैनिक ठार आणि दोन जखमी झाले आहेत.
Afghanistan Pakistan Border Clash : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सैन्याने कुनार आणि हेलमंड प्रांतांमध्ये डुरंड सीमेपलिकडे असलेल्या अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. टोलोन्यूज या अफगाण टीव्ही चॅनेलवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत किमान १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि दोन जखमी झाले. बहरामचा जिल्ह्यातील शकीज, बीबी जानी आणि सालेहान भागात जोरदार गोळीबार सुरू आहे. ही लढाई पक्तिया प्रांतातील रुब जाजी जिल्ह्यात पसरली आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे की अनेक चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.