

Why Women Are Being Called “Bibi” Instead of Their Names
esakal
Taliban Restrictions on Afghan Women’s Names in Balkh : तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानातील महिलांच्या अधिकारांवर निर्बंध लादण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता बल्ख प्रांतातून महिलांच्या ओळखीशी आणि प्रतिष्ठेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालिबान प्रशासनाने सरकारी कागदपत्रे आणि वैद्यकीय नोंदींमध्ये महिलांची खरी नावे लिहिण्यास मनाई केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महिलांना त्यांच्या नावाऐवजी 'बीबी' यांसारख्या संबोधनांनी ओळखले जात आहे. काही महिलांना तर 'गाय' आणि 'शेळी' अशा अपमानास्पद शब्दांनी संबोधल्याचेही समोर आले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा