esakal | तालिबान काय म्हणतंय यावर नाही तर काय करतंय यावरुन होईल निर्णय : अमेरिका
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban

तालिबान काय म्हणतंय यावर नाही तर काय करतंय यावरुन होईल निर्णय : US

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने आपला ताबा मिळवल्यानंतर जगातील इतर देशांना तालिबानसंदर्भात ठोस काही एक भूमिका घेणं क्रमप्राप्त ठरलंय. आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने तालिबानसंदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. अमेरिकेने म्हटलंय की, तालिबानचे त्यांच्या वक्तव्यांच्या आधारे नाही तर त्यांच्या कृतींच्या आधारे मूल्यांकन केले जाईल. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी रविवारी म्हटलंय की, अमेरिकेच्या शिष्टमंडळाने कतरमधील दोहा वार्ताच्या दरम्यान काबूलमधील वरिष्ठ तालिबानी प्रतिनिधींशी भेट घेतली आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय हिताच्या मुद्यांवर चर्चा केली.

हेही वाचा: भ्रष्टाचाराच्या आरोपनांतर ऑस्ट्रियाचे चान्सलर कुर्झ यांचा राजीनामा

अमेरिकन शिष्टमंडळाने या मुद्यांवर केली चर्चा

अमेरिकन शिष्टमंडळाने तालिबानी नेत्यांसोबत संरक्षण, दहशतवाद, अमेरिकन तसेच इतर विदेश नागरिकांची सुरक्षा इत्यादी मुद्यांवर चर्चा केली. याशिवाय दोन्ही बाजूंद्वारे अफगाण समाजाच्या सर्व पैलूंवर देखील चर्चा केली गेली. यामध्ये महिला आणि मुलींच्या संदर्भातील मुद्दे महत्त्वपूर्ण ठरले. ही चर्चा स्पष्ट आणि रितसर पद्धतीने झाली असून अमेरिकन शिष्टमंडळांने पुन्हा एकदा ही बाब अधोरेखित केली की, तालिबानचे आता केवळ त्यांच्या वक्तव्यांनी नाही तर त्यांच्या कृतींद्वारे मूल्यांकन केले जाईल.

हेही वाचा: टाटारस्तानात रशियाचं विमान क्रॅश; 19 जणांचा मृत्यू

ऑगस्टनंतर पहिलीच अमेरिका-तालिबान बैठक

तालिबान आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाने कतारची राजधानी दोहामध्ये आपली पहिली बैठक आयोजित केली होती जेणेकरुन दोन्ही बाजूंमधील संबंधाना पुन्हा एकदा नवे आयाम दिले जाऊ शकतील. ऑगस्ट महिन्यामध्ये अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्याने घरवापसी केल्यानंतर दोन्हीही बाजूंमध्ये ही पहिलीच बैठक पार पडली आहे.

loading image
go to top