सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांची गोळ्या घालून हत्या; अफगाणिस्तानमधील घटना

afganistan.
afganistan.

काबुल- अफगाणिस्तानची  (Afghanistan)  राजधानी काबुलमध्ये एका बंदुकधारीने रविवारी सकाळी दोन महिला न्यायमूर्तींची (Kabul Women Judges Killed) गोळ्या घालून हत्त्या केली आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती वार्ता सुरु असताना अशा सुनियोजित घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अफगान सरकार आणि तालिबान यांच्यात चर्चा सुरु असताना सातत्याने रक्त सांडलं जात आहे. दहशतवादी संघटनांकडून हाय प्रोफाईल व्यक्तींना लक्ष्य केलं जात आहे. 

Farmers Protest : 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडबाबत आज SC ची सुनावणी; उद्या...

अमेरिकेच्या सुरक्षा मंत्रालयाने अफगाणिस्तानमधील सैनिकांची संख्या कमी करुन 2500 करण्याचे जाहीर केले आहे. दोन दशकातील अफगाणिस्तानच्या सीमेवरील ही अमेरिकी सैनिकांची सर्वात कमी संख्या आहे. त्यातच हा हल्ला घडून आला आहे. सुप्रीम कोर्टाचे प्रवक्ता अहमद फहीम कावीम यांनी म्हटलं की, दोन महिला न्यायमूर्ती गाडीत बसून आपल्या कार्यालयात जात होत्या, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. हल्ल्यामुळे दोन्ही महिला न्यायमूर्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच कारचा चालक जखमी झाला आहे. अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायलयात जवळपास 200 महिला न्यायमूर्ती काम करत आहेत. 

काबुल पोलिसांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. अफगाणिस्तानच्या सुप्रीम कोर्टात याआधी 2017 मध्ये आत्मघाती हल्ला (Afghanistan supreme Court Attacked) झाला होता. हल्लेखोराने स्वत:ला कोर्टाच्या परिसरात उडवून दिलं होतं. या हल्ल्यात 20 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 41 जण जखमी झाले होते. 

व्हॉट्सऍपला दे धक्का! भारतातील 51 टक्के यूझर्स शोधणार नवा पर्याय

काही वर्षांपासून अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि अन्य शहरांमध्ये प्रसिद्ध नेते, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, डॉक्टर आणि सरकारी वकीलांची सुनियोजित पद्धतीने हत्त्या करण्यात येत आहे. अफगाणिस्तान सरकारने या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचं म्हटलं आहे. असे असले तरी दहशतवादी संघटनेने सरकारचा दावा फेटाळला आहे. अशा अनेक हत्त्यांची जबाबदारी तालिबानचे प्रतिस्पर्धी संघटन इस्लामिक स्टेटने घेतली आहे. 

दरम्यान, अमेरिकेने पहिल्यांदा या हत्त्यांसाठी तालिबानला जबाबदार धरलं आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैन्याचे प्रवक्ता कर्नल सॉनी लेगेट म्हणाले की, तालिबान सरकारी अधिकारी, सिविल सोसायटी लोक आणि पत्रकारांना लक्ष्य करत आहेत. ते शांती वार्तेला यशस्वी करु पाहात नाहीत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com