व्हॉट्सऍपला दे धक्का! भारतातील 51 टक्के यूझर्स शोधणार नवा पर्याय

whatsapp4
whatsapp4

नवी दिल्ली- फेसबुकच्या मालकीचे असणाऱ्या व्हॉट्सऍपने जेव्हा नव्या प्रायव्हसी पॉलिसीची घोषणा केली आहे, तेव्हापासून कंपनीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नव्या प्रायव्हयी पॉलिसीमुळे यूझर्समध्ये संभ्रम आहे आणि कंपनी यूझर्सची शंका दूर करण्यास अजूनतरी यशस्वी ठरलेली नाही. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात व्हॉट्सऍपला जगासह भारतातील अनेक यूझर्स गमवावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

भारतीय बाजारात 5 इलेक्ट्रिक कारचा राहिला दबदबा; जाणून घ्या किंमत

व्हॉट्सऍपचे कोट्यवधी यूझर्स आहेत. नव्या पॉलिसीमुळे यूझर्स आणि व्यवसायांचा कंपनीवरील विश्वास कमी झाला आहे. त्याचमुळे सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या पर्यायांकडे यूझर्स वळताना दिसत आहेत. LocalCircles च्या सर्व्हेनुसार भारतात केवळ 18 टक्के लोक फेसबुकचा वापर सुरु ठेवतील आणि कंपनीला आपला डाटा वापरु देतील. तर 36 टक्के यूझर्स व्हॉट्सऍपवर अवलंबून राहणे बंद करतील आणि नव्या पर्यांयांचाही वापर सुरु करतील. 15 टक्के यूझर्स पूर्णपणे व्हॉट्सऍपचा वापर थांबवतील. सर्व्हेमध्ये 8,977 यूझर्सचा समावेश करण्यात आला होता. 

व्हॉट्सऍपने जगभरातील आपल्या 2 अब्ज यूझर्संना नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याचे बंधन घातले आहे. नवीन पॉलिसी स्वीकारली नसल्यास तुम्हाला व्हॉट्सऍप वापरता येणार नाही. या पॉलिसीनुसार तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि काही डाटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. नवीन पॉलिसी स्वीकारण्यासाठी कंपनीने 8 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला होता, पण जगभरात निर्माण झालेल्या संभ्रमामुळे ही मुदत 15 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.  

Corona Vaccination : दुसऱ्या दिवशी 17 हजार लोकांना लस; जगातील सगळ्यात मोठं...

24 टक्के यूझर्संनी म्हटलं की ते आणि त्यांचे ग्रुप नव्या प्लॅटफॉर्मकडे वळणार आहेत. 91 टक्के यूझर्संनी म्हटलं की, व्हॉट्सऍप आमचा डाटा फेसबुक किंवा थर्ड पार्टीला विकणार असेल तर कंपनीचे पेमेंट फिचर देखील वापरणार नाही. भारतात जानेवारी महिन्यापासून व्हॉट्सऍपच्या डाऊनलोडमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दुसरीकडे सिग्नल आणि टेलिग्राम ऍपच्या डाऊललोडमध्ये वाढ झाली आहे. दरम्याने कंपनीने नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे यूझर्सच्या प्रायव्हसीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं म्हटलं आहे. 

नवीन अटी आणि नियम स्वीकारण्यासाठी निश्चित केलेली 8 फेब्रुवारी ही अंतिम तारीख व्हॉट्सअपने सध्या पुढे ढकलली आहे. प्रायव्हसी आणि सुरक्षेवरुन युजर्समध्ये असलेल्या भ्रामक शंका दूर करणार असल्याचे व्हॉट्सअपने म्हटले आहे. एका ब्लॉगपोस्टमध्ये व्हॉट्सअपने म्हटले आहे की, आम्हाला अनेकांकडून समजले आहे की, आमच्या नव्या अपडेटमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. या अपडेटच्या माध्यमातून आम्ही फेसबुकबरोबर आधीपेक्षा जास्त डेटा शेअर करणार नाही. यापूर्वी व्हॉट्सअपने ते किंवा फेसबुक युजर्सचा कोणताही मेसेज किंवा कॉल पाहू शकत नसल्याचे एका ब्लॉगच्या माध्यमातून स्पष्ट केले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com