किन्शासा : काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकातील (Democratic Republic) इरुमु भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित अलाइड डेमोक्रॅटिक फोर्सेस (ADF) या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा नरसंहार घडवून आणला आहे. या भीषण हल्ल्यात किमान 66 नागरिकांचा बळी गेला असून महिलांनाही निर्दयपणे ठार मारण्यात आले, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.