फोटो काढणाऱ्या पर्यटकांवर सिंह भडकला; पुढे काय झालं...पाहा हा व्हिडीओ...

फोटो काढणाऱ्या पर्यटकांवर सिंह भडकला; पुढे काय झालं...पाहा हा व्हिडीओ...

सिंह, वाघ, बिबट्या, चित्ता हे प्राणी दिसायला खूपच सुंदर असतात. कधी कधी वाटतं की, ते पाळीव असते तर किती बरं झालं असतं. हे प्राणी जेव्हा आपण संग्रहालयात पाहतो, तेव्हा ते इतके मस्त वाटतात की त्यांनाच घरीच घेऊन जावं असं वाटतं. त्यांचा रुबाब, त्यांचा वावर पाहून आपण खूश झाल्याशिवाय राहत नाही.

हे प्राणी प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यात पाहण्यापर्यंत ठिक आहे. इथे आपण त्यांना पिंजऱ्याजवळ जाऊन पाहू शकतो. पण हेच प्राणी जेव्हा जंगलात मुक्तपणे संचार करत असतात, तेव्हा त्यांच्यापासून दूर राहाण्यातच शहाणपण असतो. जर आपण योग्य खबरदारी घेतली नाही तर काय घडू शकते याचा अंदाज आला, सेरेनगेडी नॅशनल पार्कमध्ये सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना. त्यांचा हा व्हिडीओ पाहून कुणीही सिंहाचा फोटो काढण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल. या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला दिसतं की, काही पर्यटक गाडीतून सिंह पाहत असतात. सिंह त्यांच्या अगदी गाडीजवळ उभा होता. गाडीतील सर्वजण सिंहाला जवळून पाहत असतात. परंतु तेवढ्यात एक पर्यटक खिडकीतून हात बाहेर काढून सिंहाच्या अंगाला स्पर्श करतो तर दुसरा पर्यटक सिंहाचा फोटो काढू लागतो. पण त्यांच्या या वागणं सिंहाला रुचल्याचं दिसत नाही आणि जंगलाचे राजे भडकतात.

आतापर्यंत शांत असलेल्या सिंहाच्या चेहऱ्यावरील हावभाव अचानक बदलू लागतात. डोळ्यात राग दिसू लागतो. तो जबडा वासून गुरगरू लागतो. त्याच्या जबड्यातील तीक्ष्ण दात दिसू लागतात. सिंहाचं हे गुरगुरणे आणि त्याचा बदललेला मूड पाहून ते समजून जातात की जंगलाचे राजे आता भडकलेत आणि केव्हाही ते आपल्यावर हल्ला करू शकतात. सिंहाचा हा रुद्रावतार पाहून या सर्वांचा थरकाप उडतो. सिंह गाडीच्या खिडकीतील लोकांवर झडप घालणार तेवढ्यात ते खिडकीपासून दूर जातात यादरम्यान प्रसंगावधान राखत ड्रायव्हर गाडीही दूर घेऊन जातो. एकजण काचा लावून घेतो आणि सर्वच जण सुटकेचा निश्वास सोडतात.

आता विचार करा ड्रायव्हरने सिंहाचा पंजा एखाद्यावर पडला असता तर काय झालं असतं. टांझानियाच्या सेरेनगेडी नॅशनल पार्कमधील सिंहाचा हा रुद्रावतार पाहून पर्यटकांची पळताभुई थोडी झाली. हा व्हिडीओ पाहणारे लोकसुदधा इथून पुढे सिंहाचा फोटो काढताना दहावेळा विचार करतील.

हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला ३.७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. पर्यटकांच्या या हुल्लडबाजीवर लोक संतप्त झाल्याचं या प्रतिक्रियांवरुन दिसून येतं.

शेवटी काय आहे, आपण कुणाशी पंगा घेतोय ते लक्षात असावं. सिंह जंगलाचा राजा आहे. त्यामुळे त्याच्यापासून जपून राहणंच शहाणपणाचं लक्षण आहे, अन्यथा या पर्यटकांवर जी वेळ आलीये ती तुमच्यावर पण आल्याशिवाय राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com