मानलं रावं! एक-दोनदा नव्हे तर तब्बल 157 वेळा दिली ड्रायव्हींग टेस्ट, तेव्हा कुठे मिळालं लायसन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

आजकालच्या जमान्यात गाडी चालवण्याचे स्कील हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.

लंडन : आजकालच्या जमान्यात गाडी चालवण्याचे स्कील हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. कुठेही जाण्यासाठी, कमी वेळेत, कमी पैश्यात आणि आपली कामे तातडीने होण्यासाठी एखादे वाहन चालवण्याचे कौशल्या प्राप्त करणे आजच्या काळातील गरज आहे. मात्र, वाहन चालवायचे म्हटल्यास त्यासाठी योग्य तो परवाना घेणे  आवश्यक ठरते. लायसन्स शिवाय गाडी चालवणे हा दंडनिय अपराध ठरतो. त्यामुळे हे लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया पार पाडूनच गाडी घेऊन रस्त्यावर उतरणे इष्ट ठरते. लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया वाटते तितकी सोपीही नाहीये. आधी परिक्षा आणि नंतर मग थेट गाडी चालवण्याची ट्रायल अशा दिव्यातून वाहनचालकाला जावं लागतं. पण आपण कधी या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास झाला आहात का? म्हणजे एकदा नापास होणं साहजिक आहे. किंवा असं म्हणू की पाच-दहा-पंधरावेळादेखील नापास होऊ शकतात काही लोक. मात्र एका व्यक्तीने तब्बल 157 वेळा ड्रायव्हींग टेस्ट नापास झाल्यानंतर लायसन मिळवले आहे. मात्र त्याने कधी हार माणून माघार पत्करली नाही. आणि सरतेशेवटी 158 व्या प्रयत्नावेळी तो यशस्वी ठरला. ही घटना घडलीय दि ग्रेट ब्रिटनमध्ये... या व्यक्तीने आपलं नाव जाहीर करण्यास नकार दिलाय.

हेही वाचा - कोरोनाचं दुसरं वर्ष अधिक कठीण; WHO ने दिली खबरदारीची सूचना

खर्च आला तीन लाख
आता इतक्यांदा ड्रायव्हींग टेस्ट द्यायची म्हटल्यांवर याची फी तर द्यावीच लागणार. आता या व्यक्तीला किती खर्च आला असेल आपण कल्पना करु शकताच. या व्यक्तीला तब्बल तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. Mark Tongue  जे एक Select Car Leasing चे प्रमुख आहेत, त्यांनी म्हटलंय की, हो, हे खरंय आणि जर आपण यात पास होत नसाल तर आपल्याला एकामागोमाग एक प्रयत्न करावेच लागतात.

एका महिलेने तर 117 वेळा दिलीय टेस्ट
याप्रकारे इतक्या वेळेला टेस्ट देण्याचा पराक्रम फक्त या व्यक्तीनेच गाजवलाय असं नाहीये तर याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. ड्रायव्हींग एँड व्हेईकल स्टँडर्स एजन्सी द्वारे जाहीर केल्या गेलेल्या आकडेवारीवरुन समजतं की इंग्लंडमध्ये आतापर्यंत सर्वांत खराब कामगिरी एका महिलेची राहिली आहे. या महिलेने 117 वेळा थेअरीची परिक्षा दिली आहे आणि तिने ती अद्याप पास केलेली नाहीये. तिसऱ्या क्रमांकावर एक 48 वर्षांची महिला होती जिने शेवटी 94 व्या प्रयत्नात ही परिक्षा पास केली आहे.  काही लोकांचं म्हणणं असं आहे की, एवढ्या वेळेला नापास झाल्यावर अशा व्यक्तींना लायसन्स देऊच नये. तर काहीचं म्हणणं आहे की प्रयत्न करुन यश कमावणाऱ्यांना त्याचं फळ मिळायलाच हवं. यामध्ये लज्जास्पद काही नाहीये.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after failing 157 times man finally passes his learner drivers test