कोरोनाचं दुसरं वर्ष अधिक कठीण; WHO ने दिली खबरदारीची सूचना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

भारतात 10,495,147 रुग्ण सापडले असून पैकी  151,529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली : जगात  हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या महासंकटातून आता कुठे थोडा दिलासा मिळत आहे. अनेक देशांमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये लसीकरणास मंजूरी मिळाली असून लसीकरणास सुरवात देखील झाली आहे. भारतामध्ये येत्या 16 जानेवारीला लसीकरणास सुरवात होणार आहे. भारतातील 3 कोटी आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. यासंदर्भातील तयारी सध्या सुरु आहे. यादरम्यानच जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय की, कोरोना महासंकटाचे हे दुसरे वर्ष पहिल्या वर्षाहून अधिक कठीण असू शकतं.

WHO च्या हेल्थ इमर्जंसी प्रोग्रॅमचे कार्यकारी प्रमुख मायकल रेयान यांनी म्हटलं की कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे दुसरे वर्ष हे ट्रान्समिशन डायनामिक्सच्या बाबातीत पहिल्या वर्षांच्या तुलनेत अधिक कठीण असू शकतं. रेयान यांनी काल बुधवारी सांयकाळी एका प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान म्हटलंय की, आपण दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत. हे वर्ष ट्रान्समिशन डायनामिक्स आणि इतर काही मुद्यांच्या बाबतीत कठिण असू शकतं.

हेही वाचा - 'माझा सच्चा समर्थक कायद्यांना फाट्यावर मारुन हिंसा करु शकत नाही'; ट्रम्प यांनी केलं शांततेचं आवाहन

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्चला कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला एक जागतिक महासाथ घोषित केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाचे जगभरात 9.21 कोटीहून अधिक लोक कोरोना व्हायरसने संक्रमित आढळले आहेत. यामधील 19.7 लाख रुग्णांची स्थिती अधिक घातक आहे.  कोरोनाच्या बाबतीत जगात सर्वाधिक फटका अमेरिका या देशाला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 23,067,796 रुग्ण आढळले असून त्यापैकी 384,604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती CSSE ने दिली आहे. त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. भारतात 10,495,147 रुग्ण सापडले असून पैकी  151,529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
तर जगात कोरोना मृतांच्या बाबतीत ब्राझीलचा क्रमांक दुसरा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO says Second year of Covid19 pandemic more difficult than first