भारत आणि अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही दिला चीनला दणका

कार्तिक पुजारी
Wednesday, 15 July 2020

ब्रिटनने अमेरिकेच्या दबावापुढे झुकत आणि चीनकडून देण्यात येणाऱ्या इशाऱ्याला दुर्लक्षित करत आपल्या 5 जी नेटवर्कमधून चीनची मोठी कंपनी हुआवेईला (Huawei) बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे.

लंडन- ब्रिटनने अमेरिकेच्या दबावापुढे झुकत आणि चीनकडून देण्यात येणाऱ्या इशाऱ्याला दुर्लक्षित करत आपल्या 5 जी नेटवर्कमधून चीनची मोठी कंपनी हुआवेईला (Huawei) बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. हुआवेई जगातील प्रसिद्ध दूरसंचार उपकरण निर्माण करणारी कंपनी आहे. ब्रिटनने हुआवेई कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवल्याने चीनला मोठा झटका बसला आहे. चिनी कंपनीला टप्प्याटप्प्याने 5 जी नेटवर्कमधून बाहेर काढले जाणार आहे. 

आता 'हिंदुस्थानी राखी'मुळं चीनला बसणार 4000 हजार कोटींचा फटका
ब्रिटनने घेतलेला हा निर्णय अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात उघडलेल्या आघाडीचा विजय मानला जात आहे. ब्रिटनच्या या निर्णयानंतर व्हाईट हाऊसकडून प्रतिक्रिया आली आहे. ब्रिटनने घेतलेल्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे स्पष्ट होत आहे की हुआवेई आणि इतर अशाच प्रकारच्या अविश्वासू कंपन्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करु शकतात. या कंपन्यांची चीन कम्युनिस्ट पक्षाशी असणारी निष्ठा सर्वांना माहित आहे, असं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे. याआधी चिनी कंपनी हुआवेई राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करु शकते असं सांगत अमेरिकेत त्यावर बंदी आणली होती. 

ब्रिटनने घेतलेल्या निर्णयामुळे चीनसोबतच्या त्याच्या संबंधावर मोठा परिणाम होणार आहे. शिवाय ब्रिटनच्या मोबाईल सेवा पुरवढादारांना याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. ब्रिटन गेल्या 20 वर्षांपासून हुआवेई कंपनीच्या उपकरणांवर अवलंबुन राहिला आहे. त्यामुळे ब्रिटनलाही याची झळ सोसावी लागणार आहे. 

चीनसंदर्भातील त्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले; नाही म्हणजे नाहीच....
ब्रिटनच्या या निर्णयानंतर हुआवेई कंपनीने प्रतिक्रिया दिली असून हे पाऊल राजकारणाने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. यामुळे ब्रिटनमधील डिजिटल सेवांची गती कमी होईल, असं कंपनीने म्हटलं आहे. लंडनमधील चीनच्या राजदूत लियू शियोमिंग यांनी ब्रिटनच्या निर्णयाला चुकीचे आणि निराशाजनक म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. हुआवेई कंपनीवरील निर्बंधामुळे असे प्रश्न उपस्थित होत आहेत की, ब्रिटन दुसऱ्या देशाच्या कंपन्यांना भेदभाव विरहीत, मुक्त आणि योग्य वातावरण देऊ शकते का? असं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, चीनविरोधात आंतरराष्ट्रीय असंतोष वाढताना दिसत आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि ब्रिटननेही चीन विरोधी भूमिका घ्यालया सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनसमोरील अडचणी वाढत असून चीन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After India and America Britain also hit China