Facebook News: ट्विटरनंतर फेसबुक करणार कर्मचारी कपात; हे आहे कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meta Facebook

Facebook News: ट्विटरनंतर फेसबुक करणार कर्मचारी कपात; हे आहे कारण

नवी दिल्लीः इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर जुन्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येतोय. विशेषतः भारतीय कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. ट्विटरनंतर आता फेसबुकसुद्धा कर्मचारी कपात करणार असल्याची माहिती आहे.

फेसबुकची पॅरंट कंपनी 'मेटा'ने मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी कपात करण्याचा निश्चय केला आहे. एका रिपोर्टनुसार मार्क झुकरबर्ग यांनी चालू आठवड्यामध्ये कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निश्चय केलाय. येत्या बुधवारी ही कार्यवाही होणार असल्याचं कळतंय.

'मेटा'च्या या कर्मचारी कपातीचा फटका हजरो कर्मचाऱ्यांना बसू शकतो. कंपनीच्या (Meta Facebook) इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होईल. सप्टेंबर महिन्यामध्ये कंपनीने आपल्याकडे ८७ कर्मचारी काम करत असल्याचं सांगितलं होतं.

'मेटा'चे शेअर घसल्याचा परिणाम?

फेसबुकची पॅरंट कंपनी मेटाच्या शेअरमध्ये चालू वर्षांमध्ये ७३ टक्के घसरण झाली आहे. २०१६मधील तुटीच्याही खाली येत ५०० इंडेक्स असलेल्या साधारण कंपन्यांच्या शेअर्समध्ये मेटाच्या शेअर्सचा समावेश झाला आहे. मेटा शेअरच्या मूल्यामध्ये या वर्षात ६७ अरब डॉलरची घसरण झाली आहे. याचाच फटका कर्मचाऱ्यांना बसणार असल्याचं सांगितलं जातंय. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअपच्या कर्मचाऱ्यांवर गंडांतर येण्याचा धोका वाढला आहे.

दरम्यान, इलॉन मस्क यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी जाहीर माफी मागितली आहे. ट्विटरमध्ये पूर्वी आणि आता काम करणारे लोक प्रचंड प्रतिभाशाली आहेत. ते प्रत्येक अडचणीतून मार्ग काढू शकतात. मग कितीही वाईट काळ असो, असं ते म्हणालेत.

टॅग्स :whatsappFacebookinstagram