Beer: कोरोनाच्या दोन वर्षानंतर बिअरच्या विक्रीत वाढ

यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यात कोरोनाच्या आधीच्या विक्रीच्या सरासरीपेक्षा 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
Beer
Beer Sakal

मागच्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्वांना चांगलाच फटका बसला आहे. अनेक लोकांचे उद्योग आणि नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच वाईन इंडस्ट्रीवरही याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला होता. अभ्यासानुसार तब्बल दोन वर्षानंतर बिअरच्या विक्रीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यात कोरोनाच्या आधीच्या विक्रीच्या सरासरीपेक्षा 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

(Beer Selling After Corona 2 Year)

"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2019च्या तुलनेत 2020च्या पहिल्या पाच महिन्यात बिअरच्या विक्रीत तब्बल 80 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यानंतर 2021 मध्ये विक्रीत तब्बल 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यानंतर यावर्षी यावर्षीही विक्रीत वाढ झाली आहे." असं DeVANS Modernचे कार्यकारी संपादक प्रेम देवान यांनी सांगितलं आहे.

Beer
..तरीही काँग्रेसनं असा आक्षेप घेणं दुर्दैवी - चंद्रकांत पाटील

"तसेच आर्थिक वर्ष 2020च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023 मध्ये बिअरच्या विक्रीत तब्बल 80 टक्क्यांनी वाढ होण्याची आशा आहे." असंही ते बोलताना म्हणाले. तसेच 2023 मध्ये 80 लाख तर 2024 मध्ये 1 कोटी 20 लाखांची विक्री होण्याची आशा असल्याचं प्रेम देवान यांनी सांगितलं आहे.

Beer
Vidhan Parishad Election Live: निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणीला सुरूवात

युनायटेड ब्रुअरीज, बी9 बेव्हरेजेस आणि देवॅन्स मॉडर्न ब्रुअरीज या कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. मार्चमध्ये बिअरच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली असल्याचं युनायटेड ब्रुअरीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी परडल म्हणाले आहेत. उन्हाळा हा मद्यविक्रेत्यांसाठी चांगला हंगाम असतो वर्षभरातील ४० ते ५० टक्क्यांची विक्री ही याच हंगामात होते पण कोरोना काळात या विक्रीमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी घट झाल्याचं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com