..तरीही काँग्रेसनं असा आक्षेप घेणं दुर्दैवी - चंद्रकांत पाटील

chandrakant patil critisize congress over objection on vote of bjp mukta tilak laxman jagtap mlc election 2022
chandrakant patil critisize congress over objection on vote of bjp mukta tilak laxman jagtap mlc election 2022 Sakal

मुंबई : महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे मतदान काही वेळापूर्वीच पुर्ण झाले असून लवकरच मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या दरम्यान कॉंग्रेसकडून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान काँग्रेसनं असा आक्षेप घेणं दुर्दैवी आणि काँग्रेसची पराभूत मानसिकता दाखवणारा आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. (chandrakant patil critisize congress over objection on vote of bjp mukta tilak laxman jagtap mlc election 2022)

चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत कॉंग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. त्यांना म्हटले आहे की, "मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना कंपॅनियनची गरज लागेल, पाहताक्षणी कुणाच्याही सहज लक्षात येईल. त्यामुळे आम्ही व्हीलचेअर आणि कंपॅनियनसाठी निवडणूक आयोगाकडून रीतसर पूर्व परवानगी घेतली होती. तरीही काँग्रेसनं असा आक्षेप घेणं दुर्दैवी आणि काँग्रेसची पराभूत मानसिकता दाखवणारा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

chandrakant patil critisize congress over objection on vote of bjp mukta tilak laxman jagtap mlc election 2022
मुक्ता टिळक अन् लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

सर्व राजकीय पक्षांकडून या विधान परिषद निवडणूकीत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून आजारी असलेले भाजप पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक हे दोघेही व्हीलचेअरवर पोहचले होते. दरम्यान या निवडणूकीत गुप्त मतदान आहे. पण टिळक, जगतापांची मतपत्रिका इतर नेत्यांनी मतदान पेटीत टाकली. दोघांच्या मतदानावेळी २ सहकारी नेते उपस्थित असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. दरम्यान या आक्षेपानंतर मतमोजणी सुरू होण्यासाठी उशीर होऊ शकतो.

chandrakant patil critisize congress over objection on vote of bjp mukta tilak laxman jagtap mlc election 2022
विधान परिषद निवडणूक : काँग्रेसच्या आक्षेपावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com