esakal | VIDEO: तालिबानच्या क्रौर्याचे दर्शन; हेलिकॉप्टरला लटकावला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: तालिबानच्या क्रौर्याचे दर्शन; हेलिकॉप्टरला लटकावला मृतदेह

VIDEO: तालिबानच्या क्रौर्याचे दर्शन; हेलिकॉप्टरला लटकावला मृतदेह

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कंदाहार : अमेरिकी सैनिकांची घरवापसी होताच तालिबानने आपले रंग दाखविण्यास सुरवात केली आहे. देशातील दुसरे मोठे शहर कंदाहार येथे तालिबानने अमेरिकी हेलिकॉप्टर ब्लॅक हॉकला उडवले. हे दहशतवादी एवढ्यावरच थांबवले नाही तर एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरला लटकावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तालिबानच्या क्रौर्याची झलक पुन्हा एकदा जगाला या घटनेच्या निमित्ताने पाहावयास मिळाली आहे.

हेही वाचा: भारतात पुन्हा विक्रमी लसीकरण; आठवड्यात दुसऱ्यांदा मारली बाजी

हेही वाचा: तालिबानशी भारताची पहिली अधिकृत चर्चा; कतारमध्ये बैठक

अमेरिकेने सोडून दिलेल्या हेलिकॉप्टरचा वापर तालिबानचे दहशतवादी कंदाहारच्या गस्तीसाठी करत आहेत. व्हिडिओ फुटेजमध्ये अमेरिकी हेलिकॉप्टरला एकाचा मृतदेह लटकलेला दिसतो. हा व्हिडिओ जमिनीवरून घेतला आहे. त्यामुळे ती व्यक्ती जिवंत आहे की मृत आहे, हे समजत नाही. परंतु माध्यमांनी म्हटले की, तालिबानने एका व्यक्तीची हत्या केली आणि त्यालाच हेलिकॉप्टरला अडकवले. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या तालिब टाइम्स नावाच्या एका ट्विटर अकाउंटवर म्हटले की, कंदाहारवर गस्त घालणारे आमचे एअरफोर्स आहे.

अर्थात हे अकाउंट तालिबानशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, अब्जावधी रुपयांचे सैनिकी उपकरण अफगाणिस्तानात सोडून अमेरिकेच्या सैनिकांनी घरवापसी केली आहे. कंदाहार विमानतळावर ७३ विमानांशिवाय २७ हमविज (सैनिक वाहने) तालिबानच्या ताब्यात आले आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात मिसाईल डिफेन्स सिस्टिम, मशिनगन, नाईट व्हीजन गॉगल्सचा साठा तालिबानला मिळाला आहे.

loading image
go to top