

Iran China Trade
ESakal
अमेरिकेच्या सागरी नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर इराणने तेल आणि एलपीजीचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी एक नवीन मार्ग अवलंबला आहे. अहवालानुसार, इराण रेल्वेमार्गे चीन आणि पाकिस्तानला तेलाची वाहतूक करत आहे. इराणची वृत्तसंस्था 'फर्स'च्या दाव्यानुसार, अमेरिकेने नाकेबंदी सुरू केल्यापासूनच्या ५० दिवसांत चीनकडे जाणाऱ्या मालगाड्यांची संख्या तिप्पट झाली आहे.