Air India | 5 जी मोबाईल सेवेचा हवाई सेवेला अडथळा

फ्रिक्वेन्सीमुळे अनेक उपकरणांमध्ये हस्तक्षेप होण्याचा इशारा
Air India
Air India sakal

वॉशिंग्टन : अमेरिकेत आजपासून मोबाईल फोनसाठीची नवी ५ जी सेवा सुरु होत आहे. यामुळे अनेक सेवा अधिक चांगल्याप्रकारे मिळू शकणार असल्या तरी त्यामुळे हवाई क्षेत्रात प्रचंड अडचणी येण्याचा इशारा विमान कंपन्यांच्या प्रमुखांनी दिल्या आहेत. नवीन ५ जी सेवेमुळे अनेक विमानांचे उड्डाणच करता येणार नाही आणि त्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडू शकतात. (5G mobile service disrupts air service)

Air India
RSA vs IND 1st ODI Live Updates: टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत

अमेरिकेत एटी अँड टी आणि व्हेरिझॉन या कंपन्या ५ जी सेवा सुरु करत आहेत. अमेरिका सरकारने गेल्या वर्षी ३.७-३.९८ गिगाहर्ट्‌झ रेंजमधील स्पेक्ट्रम, म्हणजेच सी बँडची मोबाईल कंपन्यांना विक्री केली. हे नवे ५ जी तंत्रज्ञान विमानतळावरील अल्टमीटर सारख्या विविध उपकरणांच्या कामकाजात अडथळा निर्माण करू शकते, असे अमेरिकेच्या हवाई प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अल्टमीटरच्या साह्याने विमान जमीनीपासून किती उंचीवरून उड्डाण करत आहे, ते समजते. हे अल्टमीटर ४.२-४.४ गिगाहर्ट्‌झ या रेंजमध्ये काम करते आणि सरकारने मोबाईल कंपन्यांना विकलेली रेंज ही अल्टमीटरच्या रेंजच्या फारच जवळ आहे. अल्टमीटरचा उपयोग ऑटोमॅटिक लँडिंगसह आणखीही काही बाबींमध्ये होतो. त्यामुळे यामध्ये अडथळा आल्यास विमानसेवेत अनेक अडचणी येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Air India
नगरपंचायत निवडणूक: भाजप अव्वल, पाहा इतर पक्षांचं बलाबल?

५ जी सेवेचा संभाव्य परिणाम

  • विमानसेवेच्या महत्त्वाच्या कार्यप्रणालीवर परिणाम

  • १५ हजार प्रवासी विमाने, मालवाहतूक विमान उड्डाणे रद्द होण्याची शक्यता

  • टेक ऑफ आणि लँडिंग करताना वैमानिकाला आवश्‍यक असणाऱ्या उपकरणांमध्ये हस्तक्षेप शक्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com