5G विमान प्रवाशांसाठी का ठरू शकते धोकादायक? एअर इंडियाची सेवा सुरू

5G effect on Flight
5G effect on Flightsakal media

काही दिवसांपासून युझर्स 5G नेटवर्कची (5G Network) वाट पाहत होते. ते आता अमेरिकेत सुरू होत आहे. 5G मुळे युझर्सला वेगवान इंटरनेटचा आनंद घेता येईल. पण, याच 5G मुळे जगभरातील प्रवासी आणि विमान कंपन्यांची चिंता वाढली आहे. एअर इंडियाने (Air India) त्यांचे अमेरिकेला जाणारे विमान रद्द केले होते. पण, आता हे विमानसेवा पूर्ववत करण्याची आल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे. याबाबत एएनआयनं वृत्त दिलं आहे.

5G effect on Flight
OnePlus 9RT 5G स्मार्टफोनची भारतात विक्री सुरू; मिळतेय बंपर सूट

एमिरेट्स, एएनए आणि जपान एअरलाइन्ससह इतर अनेक कंपन्यांनी यूएस विमानतळांजवळ सुरू होणार्‍या 5G नेटवर्कच्या धोक्यामुळे आधीच अमेरिकेला जाणारी त्यांची काही उड्डाणे रद्द केली आहेत. अमेरिकेतील हवाई वाहतूक उद्योगातून मोठा विरोध होत आहे. यामुळे, Verizon आणि AT&T या दोन्ही कंपन्यांनी विमानतळाजवळ 5G सेवा सुरू करणे तूर्तास पुढे ढकलले आहे. 5G नेटवर्क विमानांसाठी धोकादायक का ठरू शकते? हेच आपण जाणून घेऊयात.

5G नेटवर्कमुळे बोईंग 777 धोका -

विमान निर्माता कंपनी बोईंगला त्यांच्या तपासणीत आढळले की 5G नेटवर्कमुळे बोईंग 777 विमानाच्या टेलिमेट्रीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. फ्लाइट टेलीमेट्रीमधील त्रुटीमुळे, विमानाची स्वयंचलित यंत्रणा उंचीचा अचूक अंदाज घेऊ शकत नाही. कोणत्याही वैमानिकासाठी योग्य उंचीच्या माहितीशिवाय विमान उतरवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळेच एअर इंडियासह जगभरातील अनेक विमान कंपन्यांनी अमेरिकेला जाणारे बोईंग ७७७ विमान सध्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपन्यांनी त्या मार्गांवर उड्डाण करणारे फक्त बोईंग 777 विमाने रद्द केली आहेत.

रेडिओ वेव्ह रडार अल्टिमीटरमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता -

यूएसने 5G साठी मीड-रेंज बँडविड्थ (3.7–3.9 GHz) फ्रिक्वेन्सीचा वापर केला आहे. विमानाच्या अल्टिमीटर रेडिओ सिग्नलमध्ये जवळपास सारख्याच फ्रिक्वेन्सीचा वापर केला आहे. त्यामुळे अल्टिमीटरच्या कार्यात अडचणी येऊ शकतात. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने असेही म्हटले आहे, की सी-बँड 5G काही विमानावरील रेडिओ वेव्ह रडार अल्टिमीटरमध्ये समस्या ठरू शकते. त्यामुळे विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण होते.

विमान प्रवास सुरक्षित कसा ठेवला जाईल?

प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून, सध्याच्या काळात 5G मुळे ज्या भागात रेडिओ लहरी जास्त प्रमाणात विस्कळीत होतात अशा ठिकाणी विमानांना रेडिओ अल्टिमीटर वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र, यामुळे काही विमानांना कमी दृश्यमानतेमध्ये लँडिंगसाठी त्रास होऊ शकतो. या समस्येमुळे खराब हवामानात एक हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करावी लागतील किंवा उशीर करावा लागेल, असे अमेरिकन विमान कंपन्यांचे म्हणणे आहे.

एअर इंडियाची विमानसेवा सुरू -

एअर इंडियाने 5G सुरू केल्यामुळे बुधवारपासून अमेरिकेला जाणारी 14 उड्डाणे रद्द केली होती. पण एएनआयच्या वृत्तानुसार, अमेरिकन एजन्सीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर एअर इंडियाने अमेरिकेसाठी बोईंग 777 ची सेवा पुन्हा सुरू केली आहे. रिपोर्टनुसार, आज सकाळी एअर इंडियाच्या B777 विमानाने JFK विमानतळासाठी उड्डाण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com