OnePlus 9RT 5G स्मार्टफोनची भारतात विक्री सुरू; मिळतेय बंपर सूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OnePlus 9RT

OnePlus 9RT 5G स्मार्टफोनची भारतात विक्री सुरू; मिळतेय बंपर सूट

OnePlus 9RT भारतात 14 जानेवारी रोजी लॉन्च करण्यात आला होता आणि Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान आज, 17 जानेवारी रोजी या स्मार्टफोनची देशात विक्री सुरु झाली आहे. हा हँडसेट चीनमध्ये लॉन्च झाल्यानंतर तीन महिन्यांनी भारतात लॉन्च करण्यात आला आहे या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC, 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.62-इंच फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले, 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 65 फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500mAh बॅटरी दिली आहे.

OnePlus 9RT ची भारतात किंमत

OnePlus 9RT ची किंमत 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठा 42,999, तर 12GB + 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 46,999 रुपये आहे. OnePlus ने चीनमध्ये 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंट देखील लॉन्च केला होता, तो भारतात विकला जाणार नाही. हा स्मार्टफोन हॅकर ब्लॅक आणि नॅनो सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. OnePlus 9RT ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान Amazon वर किंवा कंपनीच्या वेबसाइट वर खरेदीसाठी उपलब्ध आहे .

OnePlus 9RT स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सहा महिन्यांचा Spotify प्रीमियम फ्री मिळेल आणि कोटक आणि अॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 4,000 सूट, सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI ऑप्शनसह खरेदी करता येईनAmazon वर, SBI चे ग्राहक SBI क्रेडिट कार्डांवर 4,000 रुपयांची सूट, निवडक बँक कार्डांवर नो-कॉस्ट EMI ऑप्शन्ससह खरेदी करु शकतात.

हेही वाचा: Amazon Republic Day Sale : 'या' टॉप स्मार्टफोनवर मिळतायत बेस्ट डील्स

OnePlus 9RT स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Snapdragon 888 पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 16-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिली आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

फोनला 4500mAh बॅटरी दिला असून ती 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन कंपनीच्या OxygenOS 11 वर आधारित Android 11 वर काम करतो आणि कंपनी मार्चमध्ये या फोनसाठी Android 12 अपडेट देखील रोल आउट करणार आहे.

हेही वाचा: Amazon वर येतोय रिपब्लिक डे सेल; स्मार्टफोन, लॅपटॉपवर मिळेल बंपर सूट

Web Title: Oneplus 9rt Sale Starts In India Offering Discount Of 4000 Rupees On Amazon Sale Check Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amazon
go to top