इस्राईलच्या गोळीबारात पत्रकाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Al Jazeera Journalist killed in Israeli shooting Jerusalem
इस्राईलच्या गोळीबारात पत्रकाराचा मृत्यू

इस्राईलच्या गोळीबारात पत्रकाराचा मृत्यू

जेरुसलेम : पॅलेस्टीनी दहशतवाद्यांविरोधात जेनिन या शहरात कारवाई करत असताना इस्राईलच्या सैनिकांच्या गोळीबारात ‘अल जझिरा’ या वृत्तवाहिनीच्या ज्येष्ठ पत्रकार शिरीन अबु अक्ला (वय ५१) यांचा मृत्यू झाला. शिरीन यांच्या मृत्यूनंतर इस्राईलवर टीका होत आहे. पॅलेस्टाइन प्रतिनिधी मंडळ आणि ‘अल जझिरा’नेही शिरीन यांच्या मृत्यूसाठी इस्राईललाच जबाबदार धरले आहे. शिरीन या कतारमधील ‘अल जझिरा’ या वृत्तवाहिनीसाठी जेरूसलेममधील प्रतिनिधी म्हणून काम पहात होत्या. इस्राईलच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील जेनिन शहरातील निर्वासितांच्या छावणीमध्ये लपून बसलेल्या काही संशयित दहशतवाद्यांविरोधात इस्राईलही सैनिक कारवाई करत होते.

या कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी शिरीन आणि इतर काही पत्रकार घटनास्थळी गेले होते. त्यांनी ‘पत्रकार’ अशी अक्षरे लिहिलेले जॅकेटही परिधान केले होते. कारवाई दरम्यान संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना इस्राईलच्या सैनिकांनी मारलेली गोळी शिरीन यांच्या हाताला लागली आणि त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्याबरोबर असलेल्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या पत्रकारालाही पाठित गोळी लागली. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

इस्राईलचे म्हणणे

पत्रकारांवर गोळीबार केल्याचा आरोप इस्राईलने फेटाळून लावला आहे. या प्रकरणी सत्य समोर येण्यासाठी चौकशीची मागणी इस्राईलने केली. तसेच, पत्रकारांना पॅलेस्टीनी दहशतवाद्यांनी मारलेली गोळी लागली असावी, अशी शंकाही इस्राईलने व्यक्त केली आहे.

Web Title: Al Jazeera Journalist Killed In Israeli Shooting Jerusalem

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top