हिजाब वादात अल कायदाची उडी, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याकडून मुस्कान खानचे कौतुक|Al Qaeda Terrorist Praised Karnataka Hijab Girl | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Al Qaeda Terrorist Praised  Karnataka Hijab Girl

हिजाब वादात अल कायदाची उडी, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याकडून मुस्कान खानचं कौतुक

कर्नाटकातील हिजाब वादात (Karnataka Hijab Row) जागतिक दहशतवादी संघटना अल कायदाने (Al Queda) उडी घेतली आहे. हिजाबवर बंदी घालणे (Hijab Banned) ही दडपशाही असून भारतीयांनी त्याविरोधात आवाज उठवावा, असं चिथावणीखोर वक्तव्य अल कायदाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अयमन अल जवाहिरीनं केलं आहे. तसेच त्याने कर्नाटकातील हिजाब गर्ल मुस्कानचं (Karnataka Hijab Girl) तोंडभरून कौतुक केलं आहे. (Al Qaeda Terrorist Praised Karnataka Hijab Girl)

हेही वाचा: 'अल कायदा' पुन्हा अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत - अमेरिकन गुप्तचर यंत्रणा

अल कायदाच्या अधिकृत शबाब मीडियाद्वारे हा व्हिडिओ जारी करण्यात आला असून SITE या गुप्तचर समूहाने हा व्हिडिओ खरा असल्याचा दुजोरा दिला आहे. हा नऊ मिनिटांचा व्हिडिओ असून यामध्ये जवाहिरीने मुस्कान खानचे कौतुक केले आहे. तिला 'भारताची नोबल वुमन' म्हटलं असून मुस्कानचं कौतुक करण्यासाठी त्याने स्वतः कविता लिहिली आहे. मुस्कानचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला. ती ''अल्लाह हू अकबर'' म्हणत असल्याचे पाहून मी प्रभावित झालो. त्यानंतर तिच्या कौतुकासाठी एक कविता लिहिण्याचे ठरवले, असं हा दहशतवादी व्हिडिओमध्ये सांगतोय.

कविता वाचून झाल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशसह हिजाबवर बंदी घातलेल्या देशांवर जवाहिरीने टीका केली. तसेच त्यांना पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्याने केला. काही दिवसांपूर्वी जवाहिरीचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे समोर आले होते. पण, गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहेत. तो अफगाणिस्तानात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या मुस्कान खानच्या कौतुकामुळे तो भारतातील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे दिसतेय.

Web Title: Al Qaeda Chief Most Wanted Terrorist Praised Karnataka Hijab Girl Muskan Khan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TerroristHijabHijab Row