esakal | 'अल कायदा' पुन्हा अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत - अमेरिकन गुप्तचर यंत्रणा
sakal

बोलून बातमी शोधा

9/11

'अल कायदा' पुन्हा अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत - अमेरिकन गुप्तचर यंत्रणा

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : जगाला हादरवून टाकणाऱ्या अमेरिकेतील ट्वीन टॉवर्सवरील दहशतवादी हल्ल्यानंतर (9/11) अल कायदा ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत आहे. येत्या एक-दोन वर्षात हा हल्ला घडवून आणण्याची ते योजना आखत असल्याची धक्कादायक माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

हेही वाचा: टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या सुधारणांना मंजुरी; Vodafone-Ideaला दिलासा

अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अल कायदा अफगाणिस्तानात स्वतःची पुनर्रचना करण्याच्या तयारीत आहे. दहशतवादी संघटना पुन्हा उभी राहिल्यानंतर पुढील एक-दोन वर्षात अमेरिकेवर हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा प्लान आहे. या काळात संघटनेची आवश्यक ती सर्व बाजू सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे संचालक लेफ्टनंट जनरल स्कॉट बेरिअर यांच्या हवाल्यानं ब्लुमबर्गनं याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: "गोडसे-सावरकरांच्या RSS विचारधारेशी समझौता कधीच शक्य नाही"

अमेरिकेत मंगळवारी पार पडलेल्या एका गुप्तचर यंत्रणांच्या परिषदेत ते बोलत होते. लेफ्ट. जनरल बेरिअर म्हणाले, "आमच्या सर्व सुत्रांच्या आणि खबऱ्यांच्या माहितीनुसार अल कायदा अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सर्व अॅक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही या माहितीवर प्राध्यान्यानं लक्ष केंद्रीत करणार आहोत."

हेही वाचा: भागवतांचा फोटो कुणा महिलेसोबत दिसलाय का?- राहुल गांधी

अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं होतं की, "अमेरिकेवरील हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ठार करण्यासाठी आणि त्याची संघटना अल कायदा ज्यांना तत्कालिन तालिबान सरकारनं आश्रय दिला होता. अफगाणिस्तानातून खात्मा करण्याचा अमेरिकेचा प्राथमिक हेतू होता."

loading image
go to top