esakal | आइनस्टाइन आणि चार्ली चॅप्लिन भेटल्यावर काय बोलले?
sakal

बोलून बातमी शोधा

albert einstine and charlie chaplin

जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन आणि महान अभिनेता चार्ली चॅप्लीन यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आइनस्टाइन आणि चार्ली चॅप्लिन भेटल्यावर काय बोलले?

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन आणि महान अभिनेता चार्ली चॅप्लीन यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपआपल्या क्षेत्रात दिग्गज व्यक्तिमत्व असलेल्या या दोघांचा 90 वर्षापूर्वीचा हा फोटो आहे. ब्लॅक अँड व्हाइट असा हा फोटो नोबल प्राइज कमिटीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

फिजिक्सचं नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन आणि अभिनेते चार्ली चॅप्लिन यांच्या भेटीची एक आठवण म्हणून नोबेल प्राइज कमिटीने हा फोटो शेअर केला आहे.  याला कॅप्शन देताना म्हटलं की, चॅर्ली चॅप्लिन असे एकमेव कलाकार होते ज्यांना भेटण्यासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आतुर होते. दोघांची भेट 1931 मध्ये लाॅस अँजेलिसमध्ये फिल्म सिटिलाइट्सच्या प्रिमियरवेळी झाली होती. 

दोन दिग्गजांनी या भेटीवेळी एकमेकांशी काय चर्चा केली हेसुद्धा नोबेल प्राइज कमिटीने सांगितलं आहे. आइन्स्टाइन चार्ली चॅप्लिन यांना म्हणाले होते की, मी तुमच्या कलेचं सर्वात जास्त कौतुक करतो ते म्हणजे तुमच्या सार्वभौमत्वाचं. तुम्ही एकही शब्द बोलत नाही तरीही जगाला तुम्ही काय सांगता आहात ते समजतं. 

चॅप्लिन यांनीही आइनस्टाइन यांचे कौतुक करता म्हटलं की, तुम्ही यापेक्षा खूप महाना आहात. तुम्ही बोललेला एक एक शब्द क्वचितच एखाद्याला समजतो पण सगळं जग तुमचं कौतुक करतं. 

हे वाचा - होय! एकेकाळी कोरोनासमोर हतबल झालेल्या या देशातील चित्रपटगृहे पुन्हा सुरु

अल्बर्ट आइनस्टाइन हे एक जर्मन नागरिक होते. ते अमेरिकेत आले होते तेव्हा चार्ली चॅप्लिन यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीचा दुर्मीळ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर एका युजरनं कमेंट करताना म्हटलं की, आर्टिस्टचा मित्र साइंटिस्ट.