esakal | आइन्स्टाइनने E=MC2 लिहलेल्या कागदाचा लिलाव; मिळाला छप्परतोड भाव
sakal

बोलून बातमी शोधा

आइन्स्टाइनने E=MC2 लिहलेल्या कागदाचा लिलाव; मिळाला छप्परतोड भाव

आइन्स्टाइनने E=MC2 लिहलेल्या कागदाचा लिलाव; मिळाला छप्परतोड भाव

sakal_logo
By
विनायक होगाडे

वॉशिंग्टन : जगातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांची E=mc2 ही थेअरी प्रसिद्ध आहे. आइन्स्टाइन (Albert Einstein) यांनी अथक प्रयत्नांनी मांडलेल्या या थेअरीमुळे विज्ञान जगताची प्रगती होण्यास मोठ्या प्रमाणात फायदा झाला. थेअरी ऑफ रिलेटीव्हीटीचे उद्गाते आइन्स्टाइन यांनी आपल्या आयुष्यात फक्त चारच वेळा E=mc2 लिहलं होतं. यातील एक पत्र गेल्या काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक करुन तिचा लिलाव केला गेला आहे. तुम्हाला पटणार नाही इतका भाव या पत्राला आला असून तो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. E=mc2 ही थेअरी गणित आणि विज्ञान जगतातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि चर्चित थेअरी मानली जाते. या थेअरीच्याच माध्यमातून आइन्स्टाइन यांनी जगाला पहिल्यांदा उर्जा आणि द्रव्यमानमधील सहसंबंध उलगडून सांगितला होता. आइन्स्टाइन यांनी आपल्या आयुष्यात फक्त चारच वेळा या थेअरीला कागदावर लिहलं होतं. (Albert Einstein letter with Emc2 equation in his own hand sells for 9 crore)

हेही वाचा: VIDEO: चीनच्या झुरोंग बग्गीचा मंगळावरील प्रवास सुरू

आइन्स्टाइन यांचं हे पत्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या खासगी कलेक्शनमध्ये ठेवली होतं जे अलिकडेच सार्वजनिक केलं गेलं होतं. असं म्हटलं जात होतं की आइन्स्टाइन यांच्या या ऐतिहासिक पत्राला जवळपास 4 लाख डॉलर म्हणजे जवळपास 2 कोटी 80 लाख रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो मात्र लिलावादरम्यान आइन्स्टाइन यांच्या या पत्राला अंदाजापेक्षाही तिप्पट म्हणजेच 13 डॉलर अर्थात जवळपास 9 कोटी रुपये भाव मिळाला आहे. आइन्स्टाइन यांचं हे पत्र खूपच ऐतिहासिक आहे. त्यांनी हे पत्र 26 ऑक्टोबर 1946 साली अमेरिकन वैज्ञानिक लुडविक सिलबरस्टीन यांना लिहलं होती.

हेही वाचा: बापरे! आतड्यांच्या दुर्मिळ ब्लॅक फंगसचे दोन नवे रुग्ण

लुडविक सिलबरस्टीन हे एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते, ज्यांनी आइन्स्टाइनच्या थेअरीला चॅलेंज केलं होतं. आइन्स्टाइन यांनी हे पत्र जर्मन भाषेत सिलबरस्टीन यांना लिहलं होती. त्यांनी म्हटलं होतं की, तुम्ही मला जो प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर देखील E=mc2 या थेअरीनेच मिळू शकतं. आइन्स्टाइन यांचं हे उत्तर सिलबरस्टीन यांनी सांभाळून ठेवलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वंशजांनी या पत्राला विकलं होतं. आणि आता आइन्स्टाइन यांच्या या पत्राचा लिलाव केला गेला आहे.

loading image
go to top