नवाल्नी यांच्यावर होती पोलिसांची पाळत; सहकाऱ्याने एक डीश ऑर्डर केल्याने लागला पत्ता 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 23 August 2020

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधक अॅलक्सी नवाल्नी गुरुवारी अत्यवस्थ होण्यापूर्वी काही दिवसांपासून त्यांच्यावर पोलीस पाळत ठेवून होते.

मॉस्को- रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधक अॅलक्सी नवाल्नी गुरुवारी अत्यवस्थ होण्यापूर्वी काही दिवसांपासून त्यांच्यावर पोलीस पाळत ठेवून होते. 
मोस्कोवस्की कोम्सोमोलेट्स या टॅब्लॉईड दैनिकाने कायदा व सुरक्षा संस्थेच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. त्यानुसार समर्थकांनी नवाल्नी यांच्यासाठी एक निवासी इमारत भाड्याने घेतली होती. त्यांच्याबरोबर राहणाऱ्या एका सहकाऱ्याने सुशी डीशची (जपानी माशाच्या खाद्यपदार्थ) ऑर्डर मागवल्यानंतर फेडरस सिक्युरिटी बोर्डच्या (एफएसबी) अधिकाऱ्यांना ठावठिकाणा कळला. 

US Election: डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहिणीने त्यांच्यावर केले गंभीर आरोप

या वृत्तानुसार नवाल्नी यांच्या हालचालींचा माग ठेवलेल्या अधिकाऱ्यांना त्यांची प्रकृती बिघडण्याबद्दल संशय घेता येईल अशी एखादी व्यक्ती संपर्कात आल्याचे आढळले नाही. त्यांच्यावर विषप्रयोग झाला असेल तर तो एक तर विमानतळावर किंवा विमानात तसे घडले असणार. 

हवेचा नमुनाही घेतला 

नवाल्नी यांच्या पथकाने दौऱ्यावर भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणामधील नमुने पोलिसांनी घेतले आहेत. यात हवेच्या नमुन्याचाही समावेश आहे. प्रयोगशाळेतील तपासणी अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. प्राथमिक अहवाल सोमवारी येणार आहे. किरणोत्सारी वस्तूंबाबतचे अहवाल त्यानंतर येतील. हे अहवाल जाहीर केले जाणार की नाही हे मात्र वृत्तात नमूद नाही.  

विषप्रयोग नाहीच, रक्तदाब... 

मॉस्कोहून सायबेरियातील टोम्स्क येथे जाणाऱ्या विमानात नवाल्नी यांना अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे विमान तातडीने ओम्स्क येथे उतरवण्यात आले. तेथील रुग्णालयात उपचार केलेल्या डॉक्टरांनी मात्र विषप्रयोगाची शक्यता फेटाळून लावली आहे. कमी रक्तदाबामुळे चपायपचयाचा विकार झाला असे निदान त्यांनी केले आहे. 

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय पंतप्रधानांचा डंका; ट्रम्प यांच्या प्रचार व्हिडिओत...

अनेक खोल्या आरक्षित... 

नवाल्नी यांचे सहकारी स्थानिक हॉटेलमध्ये अनेक खोल्या आरक्षित करायचे. नावाने आरक्षित झालेल्या खोलीत मात्र ते झोपायचे नाहीत. नवाल्नी यांच्यावर पाळत ठेवली जाण्याचे प्रमाण पाहून आम्हाला अजिबात आश्चर्य वाटत नाही. आम्हाला पूर्वीपासून याची पुरेपूर कल्पना आहे. आश्चर्य याचेच वाटते की, सुरक्षा संस्थेतील सूत्रांनी त्याचे वर्णन करताना आढेवेढे घेतले नाहीत, अशी प्रतिक्रिया नवाल्नी यांच्या प्रवक्त्या किरा यार्मीश यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alexei Navalny poison russia vladimir putin