पहिला ‘स्पेसवॉक’ करणारे ॲलेक्‍सी लेनोव्हो यांचे निधन

पीटीआय
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

‘स्पेसवॉक’ करणारे पहिले अंतराळवीर ॲलेक्‍सी लेनोव्हो (वय ८५) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. तत्कालीन सोव्हिएत महासंघाचे अंतराळवीर असलेल्या लेनोव्हो यांनी १९६५ मध्ये हा ‘स्पेसवॉक’ केला होता.

मॉस्को - ‘स्पेसवॉक’ करणारे पहिले अंतराळवीर ॲलेक्‍सी लेनोव्हो (वय ८५) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. तत्कालीन सोव्हिएत महासंघाचे अंतराळवीर असलेल्या लेनोव्हो यांनी १९६५ मध्ये हा ‘स्पेसवॉक’ केला होता. 

‘हिरो ऑफ सोव्हएत युनियन’ हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना दोनदा मिळाला होता. अंतराळात जाणारे पहिले मानव ठरलेले युरी गागारिन यांच्याबरोबर लेनोव्हो यांची खास मैत्री होती. गागारिन १९६१ मध्ये अंतराळात गेले होते. त्यानंतर चार वर्षांनी ‘व्होस्कोद-२’ मोहिमेतून गेलेल्या ॲलेक्‍सी लेनोव्हो यांनी बारा मिनिटे आणि नऊ सेकंद ‘स्पेसवॉक’चा विक्रम केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alexy lenovo passed away