12 वर्षाच्या मुलानं रॅपद्वारे सांगितलं पॅलेस्टिनचं दु:ख

rap
rap
Summary

इस्त्रायल आणि गाझातील दहशतवादी संघटना हमासमध्ये भयावह असा संघर्ष सुरु आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे जास्तीत नुकसान करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत

जेरुसलम- इस्त्रायल आणि गाझातील दहशतवादी संघटना हमासमध्ये भयावह असा संघर्ष सुरु आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे जास्तीत नुकसान करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दोघांच्या या संघर्षात सर्वसामान्यांचा बळी जात आहे. अशात एका मुलाचा रॅप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुलाने पॅलेस्टिनींचे दु:ख आपल्या रॅपच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाच्या मागे सर्वत्र उद्धवस्त झालेल्या इमारती दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून याला आतापर्यंत २० लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. (All we want is peace 12 year old recites Palestine plight in powerful rap)

अब्दल रेहमान अल-शन्टी या १२ वर्षाच्या मुलाने हा रॅप केला असून इस्त्रायल-पॅलेस्टिनी संघर्षादरम्यान याला महत्व प्राप्त झालंय. दीड मिनिटाच्या या रॅपमध्ये मुलगा पॅलेस्टिनी लोक सध्या अभुववत असलेल्या परिस्थितीचे वर्णन करत आहे. '' गेले काही दिवस आमच्यासाठी खूप कठीण जात आहेत. मला फक्त जगातील लोकांना पॅलेस्टिनमधील भयावह परिस्थिती सांगायची आहे. गेल्या अनेक शतकांपासून आम्ही येथे राहत आहोत. सर्वांनी सुरक्षित राहावं, आम्हाला फक्त शांतता हवी आहे'', असं मुलगा आपल्या रॅपमध्ये म्हणतो.

मुलाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे तो हा रॅप करताना त्यांच्या मागे सर्व काही उद्धवस्त झालेलं दिसत आहे. इमारती कोसळल्या आहेत. परिसरात बॉम्ब पडला असावा, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसत आहे. त्या ठिकाणी १२ वर्षाचा मुलगा रॅप करतोय आणि सर्वांना शांततेचा संदेश देतोय. काही दशकांपूर्वी पॅलेस्टिन बळकावण्यात आलं, पण हे शतकांपासून आमचं घर आहे. याच ठिकाणी माझ्या कुटुंबियांच्या आठवणी आहेत, असं मुलगा व्हिडिओमध्ये म्हणतो.

rap
अमोल कोल्हे म्हणाले, ''कोरोनात राजकारण कराल, तर...''

व्हिडिओ शेअर केल्यानंतर याला लोकांची पसंती मिळत आहे. या व्हिडिओकडे आंतरराष्ट्रीय कलाकारांचे लक्ष वेधलंय. त्यांनी या मुलांच्या रॅपची स्तुती केली आहे. दरम्यान, इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझातील सर्वसामान्य लोकांना विस्थापित व्हावं लागलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com