अमोल कोल्हे म्हणाले, ''कोरोनात राजकारण कराल, तर...'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amol kolhe

अमोल कोल्हे म्हणाले, ''कोरोनात राजकारण कराल, तर...''

वाघोली- सध्या नागरिकांचे जीव वाचवणे. त्यांना आधार देणे महत्वाचे आहे. अशा गंभीर परिस्थितीत लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी जर राजकारण करत असतील तर मतदारांच्या नजरेतून ते पूर्ण पणे उतरतील. एक खासदार नव्हे तर एक मतदार म्हणून माझे स्पष्ट मत असल्याचे खासदार डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सांगितले. (If you do politics in corona you will not trusted by voters ncp mp Amol Kolhe)

डॉ कोल्हे यांनी पूर्व हवेलीतील अनेक गावासह वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हे पुढे म्हणाले, सध्या एकमेकांना आधार देण्याची गरज आहे. कोरोनाची लाट आली आणि अनेकांचे जीव गेले. कोरोनाचा नायनाट झाल्यानंतर हवे तेवढे राजकारण करा. आता शक्य होईल तेवढी मदत करा. सध्या लसीचा तुटवडा आहे. केंद्रावर हस्तक्षेप करण्यापेक्षा राजकीय कार्यकर्त्यांनी नोंदणी व अन्य कामासाठी मदत करावी. कोरोनाची लाट सध्या कमी होत असली तरी हलगर्जी पणा चालणार नाही. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. जास्तीत जास्त तपासणी करण्यासाठी किट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे.

हेही वाचा: खताची दरवाढ कमी होण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू : डॉ. अमोल कोल्हे

हेही वाचा: वाघोली : "कोरोना लसीकरण ही राष्ट्रीय मोहीम, कोणीही श्रेयवादात पडू नये"

लसीचे अन्य कंपन्यात उत्पादन करून जास्तीत जास्त लस उपलब्ध होईल यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी आपल्या भागात लक्ष ठेवून नागरिकांना कशी मदत होईल. याकडे पाहिले पाहिजे. असेही डॉ कोल्हे यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी सरपंच वसुंधरा उबाळे, रामदास दाभाडे, राजेंद्र सातव, शिवदास उबाळे, राजेंद्र वाल्हेकर, बाळासाहेब सातव, गणेश सातव, मंगेश सातव, डॉ वर्षा गायकवाड आदी उपस्तीत होते. डॉ कोल्हे यांच्या भेटी प्रसंगी अनेक ग्रामपंचायतींनी पत्र देऊन आपल्या मागण्या मांडल्या.

राजेंद्र सातव यांची 10 लाख देण्याची तयारी

वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव यांनी डॉ अमोल कोल्हे याना पत्र देऊन आपली दहा लाख रुपयांची मदत देण्याची तयारी असल्याचे सांगितले. वाघोलीतील नागरिकांचे जास्तीत जास्त व लवकर लसीकरण व्हावे यासाठी ही मदत वापरावी असे सातव यांनी पत्रात उल्लेख केला आहे.

Web Title: If You Do Politics In Corona You Will Not Trusted By Voters Ncp Mp Amol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dr Amol Kolhe