esakal | जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचं वजन किती माहित आहे का?
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचं वजन किती माहित आहे का?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

चीनच्या वुहान प्रांतातून फैलाव झालेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगाला कवेत घेतलं आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. कोविडचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या या कोरोनाचं नेमकं वजन (Coronavirus Weight) किती असेल हा प्रश्न अनेकांच्या मनाला शिवून गेला असेल. याच अनुत्तरीत प्रश्नाचं उत्तर आता संशोधकांनी दिलं आहे. अलिकडचे करण्यात आलेल्या संशोधनामध्ये कोरोनाचं वजन स्पष्ट करण्यात आलं आहे. (all-world-coronavirus-weight-is-only-one-apple-weight)

इस्त्राइलच्या विजमन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी याविषयी अभ्यास केला असून त्यांनी सादर केलेल्या अहवालात कोरोनाचं एकूण वजन सांगितलं आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनाचा अहवाल प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) मध्ये 3 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, कोरोनाचं वजन हे एका सफरचंदाच्या वजनापासून नवजात बालकाच्या वजनाइतकं असू शकतं.

हेही वाचा: Fact Check: घरगुती उपचारांमुळे कोरोना बरा होतो? सत्य आलं समोर

जगातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नमुन्याद्वारे कोरोनाचं वजन काढण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी १० लाख ते १ कोटी जणांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येतं. त्या अंदाजानुसार, वैज्ञानिकांनी हा अभ्यास केला आहे.

संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचं वजन 0.1 ते 10 किलोग्रॅमपर्यंत असू शकतं. परंतु, वजन कमी असल्याचा त्याचा धोका कमी असेल असं नाही. त्याचा धोकादेखील जास्त वजनाइतकाच असतो. त्यातच कमी वजनाच्या विषाणूमुळेच याचा संसर्ग अधिक होतो. सध्या जगात १७. ३कोटीपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३७ लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्याचवेळी कोरोना विषाणूच्या वजनाच्या प्रक्रियेसाठी माकडांमध्ये कोविड संसर्गाचा दर तपासला होता, असं विजमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या डिपार्टमेंट ऑफ प्लॉन्ट अँण्ड एनव्हायरमेंटल सायन्सेस विभागातील प्राध्यापक रॉन मिलो यांनी सांगितलं.