
Best Boss : बॉस असावा तर असा! चक्क दहा हजार कर्मचाऱ्यांना Disney World ट्रिपचं फ्री पॅकेज
बॉसला खूश करण्यासाठी कर्मचारी काय काय करतात, याचे अनेक उदाहरणे तुम्ही वाचली असाल पण कधी बॉसनी कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय, असं तुम्ही क्वचितच वाचलं असाल. सध्या कर्मचाऱ्यांना खुश करणारा असाच एक बॉस चर्चेत आहे.
Citadel & Citadel Securities चे मालक ग्रिफीन यांनी कंपनीतील चक्क दहा हजार कर्मचाऱ्यांना Disney World ट्रिपचं फ्री पॅकेज दिलंय. या पॅकेजमध्ये कर्मचाऱ्यांची तीन दिवस ट्रिप स्पॉन्सर केली असून या ट्रिपचा पुर्ण खर्च ते करणार आहे. विशेष म्हणजे कर्मचारी या ट्रिपमध्ये आपल्या कुटूंबातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे. (free 3 Day Trip To Disney World for Employees)
हेही वाचा: Job Cuts : मंदीचे सावट! भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने दिला 20,000 कर्मचाऱ्यांना नारळ
कंपनीला 20 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्त्याने कर्मचाऱ्यांना आपल्या कुटूंबासोबत Disney World ट्रिपवर जाण्याची संधी देण्यात आली आहे. फ्लाईटपासून ते होटल पर्यंतचा सर्व खर्च ग्रिफीन स्वत: करणार आहे.
कंपनीने सांगितले की न्यूयॉर्क, ह्यूस्टन, पॅरिस, ज्यूरिख आणि अन्य शहरांसाठी फ्लाइटचे पैसे, होटेल, थीम पार्कचे तिकीट आणि खाण्यापासून पार्कींगची फी सर्व खर्च ग्रिफीन करणार आहे.
हेही वाचा: Global Peace Index : या देशांकडे स्वतःचे सैन्य नसूनही आहेत जगातलं सर्वात सुरक्षित देश
केन ग्रिफीन यांच्या आयुष्यात त्यांनी खूप पैसा डोनेट केला ज्यामध्ये कला, शिक्षा आणि मेडिकल क्षेत्रात त्यांनी मोठ्या प्रमाणावर दान केलं.
सध्या या बॉसची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेटकरी यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.