Amazonच्या सीईओंचा कर्मचाऱ्यांना पुन्हा झटका! ई-मेल पाठवला अन्...

सीईओ अँडी जॅसी यांनी नक्की ई-मेलमध्ये काय म्हटलंय वाचा
Amazon Layoffs 2023
Amazon Layoffs 2023

नवी दिल्ली : Amazonमध्ये पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात होणार आहे. यावेळी अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी कर्मचाऱ्यांना थेट ई-मेलद्वारे कामावरुन काढून टाकलं आहे.

अॅमेझॉनमध्ये दुसऱ्यांना होत असलेल्या या नव्या कर्मचारी कपातीमध्ये ९००० जणांना नोकरी गमवावी लागणार आहे. (Amazon CEO cuts 9000 more jobs informs employees through email)

Amazon Layoffs 2023
US govt report: भारतात 2022मध्ये मानवाधिकार उल्लंघनाच्या गंभीर घटना! काय म्हटलंय अहवालात?

ही नवी कर्मचारी कपात अॅमेझॉनच्या विविध विभागांमध्ये केली जाणार आहे. या कपातीचा AWS, PXT, Advertising आणि Twitch या विभागांना फटका बसणार आहे. सीईओ अँडी जॅसी यांनी आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये याची माहिती दिली आहे.

Amazon Layoffs 2023
BS Yeddyurappa: येडियुरप्पा यांचा लेक करणार का पक्षात बंड ?भाजपच्या उत्तराधिकारीपदावरून घमासान

कॉस्ट कटिंगसाठी जानेवारी महिन्यात अॅमेझॉननं १८००० कर्मचारी कपात केली होती. जॅसी यांनी हे देखील सांगितलंय की, कंपनीनं पहिल्या फेरीत कपातीची घोषणा केली नाही कारण विभागांमधील सर्व कर्मचार्‍यांचे अंतर्गत मूल्यांकन पूर्ण झाले नव्हते.

मूल्यांकन आता पूर्ण झालं असल्यानं कंपनी आणखी 9,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. यामुळं अॅमेझॉन जगभरातील 27,000 कर्मचारी कपात केली आहे.

हे ही वाचा : झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com