ऍमेझॉनने पेंटॅगॉनला न्यायालयात खेचले 

वृत्तसंस्था
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

मायक्रोसॉफ्ट कंपनीला 10 अब्ज डॉलरचे कंत्राट दिल्याबद्दल ऍमेझॉन कंपनीने अमेरिकेचा प्रशासकीय विभाग असलेल्या पेंटॅगॉनला न्यायालयात खेचले आहे. सरकारने पक्षपातीपणा करत हे कंत्राट मायक्रोसॉफ्टला दिल्याचा ऍमेझॉनचा आरोप आहे.

वॉशिंग्टन - मायक्रोसॉफ्ट कंपनीला 10 अब्ज डॉलरचे कंत्राट दिल्याबद्दल ऍमेझॉन कंपनीने अमेरिकेचा प्रशासकीय विभाग असलेल्या पेंटॅगॉनला न्यायालयात खेचले आहे. सरकारने पक्षपातीपणा करत हे कंत्राट मायक्रोसॉफ्टला दिल्याचा ऍमेझॉनचा आरोप आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

क्‍लाउड कॉम्प्युटिंगच्या कंत्राटासाठी मायक्रोसॉफ्टने दाखल केलेल्या निविदेवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली होती. त्यानंतर पेंटॅगॉनने ऑक्‍टोबर अखेरीस कंत्राट मायक्रोसॉफ्ट कंपनीला दिले. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि कोणत्याही दबावाविना झाल्याचा दावा अमेरिकेनचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी केला आहे. या कंत्राटासाठी मायक्रोसॉफ्ट, ऍमेझॉन, ओरॅकल आणि आयबीएम या कंपन्यांनी निविदा सादर केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon files law suit contesting Pentagon