मंदिर बांधण्यासाठी हिंदू संघटनेनं दलित, आदिवासींना कमी पैशात राबवलं; US न्यायालयात खटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Organization

अमेरिकेतील एका प्रसिद्ध हिंदू संघटनेवर गंभीर आरोप करण्यात आलाय.

मंदिर बांधण्यासाठी हिंदू संघटनेनं दलित, आदिवासींना कमी पैशात राबवलं

न्यूयॉर्क : अमेरिकेतील (America) एका प्रसिद्ध हिंदू संघटनेवर (Hindu Organization) गंभीर आरोप करण्यात आलाय. हिंदू संघटनेनं भारतीय मजुरांना (Indian laborers) मंदिरांच्या बांधकामात काम करण्याचं आमिष दाखवलं आणि शेकडो मजुरांना कमी वेतनावर काम करण्यास भाग पाडलं, असा आरोप आहे. या वर्षी मे महिन्यात भारतीय कामगारांनी बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेवर (BAPS) आरोप करत यूएस जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र, BAPS अधिकाऱ्यांनी कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

न्यूयॉर्क टाइम्सनं बुधवारी आपल्या अहवालात म्हटलंय, की BAPS वर भारतातील कामगारांना अटलांटा, शिकागो, ह्यूस्टन आणि लॉस एंजिल्स जवळील मंदिरांमध्ये काम करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तसेच रॉबिन्सविले, न्यू जर्सी येथे त्यांना दरमहा फक्त USD 450 पगार मिळत होता. यासोबतच शेकडो कामगारांची पिळवणूक केल्याचा आरोपही करण्यात आलाय. 2018 च्या सुमारास या मजुरांना धार्मिक व्हिसावर अमेरिकेत आणण्यात आलं होतं, असं सांगण्यात आलंय.

हेही वाचा: हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटनांशी करणाऱ्या माजी मंत्र्याविरुध्द गुन्हा

इंडिया सिव्हिल वॉच इंटरनॅशनलनं (ICWI) मे मध्ये PTI ला दिलेल्या निवेदनात म्हटलंय, 11 मे रोजी पहाटे FBI च्या छाप्यांमध्ये सुमारे 200 कामगारांची सुटका करण्यात आली, त्यापैकी बहुतांश दलित, बहुजन आणि आदिवासी होते. ICWI नं सांगितलं, की कामगारांना US$ 1.2 प्रति तास पगार दिला जात होता, जो खूप कमी आहे. कामगारांना नियमानुसार किमान वेतन US$7.25 प्रति तास द्यायला हवं होतं, असं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: तालिबान्यांच्या दहशतीनं 3 लाख लोक अफगाणिस्तानातून पळाले इराणला

loading image
go to top