वॉशिंग्टन - युद्धविराम आणि व्यापारविषयक मुद्द्यांवरून परस्परांवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांनी आता पुन्हा एकमेकांविरोधात दंड थोपटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी युद्धाबाबत केलेल्या प्रक्षोभक विधानानंतर ‘अमेरिकेने दोन अण्वस्त्रवाहू पाणबुड्या तैनात केल्या आहेत,’ असे सांगून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला सूचक इशारा दिला. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर रशियानेही त्याला प्रत्युत्तर दिले.‘ट्रम्प यांनी पाठविलेल्या दोन अमेरिकी पाणबुड्यांचा मुकाबला करण्यासाठी समुद्रामध्ये पुरेशा अण्वस्त्रधारी पाणबुड्या रशियन आहेत,’ असे ‘क्रेमलिन’कडून सांगण्यात आले. सोशल मीडियावरून ट्रम्प यांनी रशियाबाबत विधान केले होते..ते म्हणाले, ‘मेदवेदेव यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे दोन अण्वस्त्रवाहू पाणबुड्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रशियाच्या माजी अध्यक्षांच्या मूर्खपणाच्या वक्तव्याला उत्तर म्हणून ही तयारी केली आहे. शब्द खूप महत्त्वाचे असतात आणि अनेकदा त्यातून अनपेक्षित परिणाम होऊ शकतात.’ट्रम्प पुढे म्हणाले, ‘अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ रशियामध्ये जात असून ते युक्रेनमधील युद्धविरामाबाबत चर्चा करतील. जर या संबंधांमध्ये प्रगती झाली नाही तर त्यांच्यावर नवीन आर्थिक निर्बंध लावण्यास आम्ही मोकळे आहोत.’.संबंध नाजूक वळणावररशिया आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध नाजूक वळणावर आहेत. पाणबुड्या पुन्हा तैनात करण्याबाबतची पोस्ट ट्रम्प यांनी गुरुवारी पहाटे केली होती. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ट्रम्प हे न्यू जर्सीमध्ये वीकेंडसाठी रवाना होत असताना, पत्रकारांनी त्यांना विचारले की पाणबुड्या कुठे तैनात केल्या आहेत, त्यावर त्यांनी कोणतीही ठोस माहिती दिली नाही. 'आपल्याला हे करणे भाग होते. आपल्याला फक्त सावध राहावे लागेल,' असे ट्रम्प म्हणाले..आरोप-प्रत्यारोपांचे वारगेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे द्वंद्व रंगले आहे. ‘युक्रेनसोबत आठ ऑगस्टपर्यंत शस्त्रसंधी झाली नाही, तर रशिया आणि तेल खरेदी करणाऱ्या देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादला जाईल,’ असा इशारा ट्रम्प यांनी रशियाला दिला होता.दरम्यान ‘रशियाकडे अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता आहे हे ट्रम्प यांनी लक्षात ठेवले पाहिजे,’ असे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी रशियाला इशारा दिला आहे..पॉवेल यांच्यावर ट्रम्प नाराजवॉशिंग्टन - ‘फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर्स बोर्डाचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचे अधिकार काढून घ्यावेत,’ अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. अल्पकालीन व्याजदर कमी न केल्याबद्दल पॉवेल यांच्यावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. ‘ट्रूथ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी पॉवेल यांना ‘अडेलतट्टू’ असे संबोधले आहे..महासागरातील रशियन अण्वस्त्रधारी पाणबुड्यांची संख्या ही अमेरिकी पाणबुड्यांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. अमेरिकी नेत्याने पाणबुड्यांबाबत केलेल्या विधानाला रशियन फेडरेशनकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्याची गरज नाही.- व्हिक्टर वोडोलात्स्की, रशियन संसदेचे सदस्य.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.