China : चीनला रोखण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया अन् ब्रिटनचा मोठा प्लान; 13 तारखेला होणार 'हा' करार

China News
China Newsesakal

नवी दिल्लीः चीनला रोखण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन मिळून ऑस्ट्रेलियाला शक्तिशाली शस्त्रे देण्याच्या तयारीत आहेत. या शस्त्रांची डील २०२१ मध्ये झाली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन १३ मार्च २०२३ रोजी सॅन डिएगोमध्ये ऑस्टॅलिया आणि ब्रिटनच्या नेत्यांना भेटणार आहेत. ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. या पाणबुड्या कॅबनेरा डिफेन्स प्रोजेक्ट अंतर्गत दिल्या जातील. या करारामुळे चीनला धास्ती बसली आहे

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांनी मिळून AUKUS प्लानची घोषणा २०२१ मध्ये केली होती. यामुळे इंडो पॅसिफिक भागात चीनला काउंटर करता येईल. वस्तूतः अमेरिकेमध्ये तंत्रज्ञान हस्तांतर करण्यासंबंधीचे नियम कठोर आहेत. तरीही हा निर्णय लगबगीने घेण्यात येतोय. ऑस्ट्रेलिया देश अमेरिकेकडून पाच वर्जिनिया क्लास न्यूक्लिअर पाणबुड्या खरेदी करत आहे. ही डिलिव्हरी २०३० पर्यंत होईल.

China News
Mumbai Accident : मुंबईत विचित्र अपघात; रिक्षावर कोसळला लोखंडी खांब, महिलेचा मृत्यू

या कराराच्या वाटाघाटीमध्ये जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथली एलबानीज आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सहभागी होतील. करारानुसार अमेरिकेच्या पाणबुड्या ऑस्ट्रेलियाच्या बंदरांवर टेहळणी करतील. या पाणबुड्यांमध्ये ब्रिटिश डिझाईन आणि अमेरिकी तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे. अमेरिका २०२७मध्ये दोन पाणबुड्या ऑस्ट्रेलियाच्या सीमांवर तैनात करेल.

तिकडे चीनने तिन्ही देशांच्या या कराराला विरोध केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन हे देश चीनच्या सैन्य ठिकाणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर चीन तैवानवर दबाव आणत आहे. तसेच चीनकडून दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगण्यात येतोय. त्यामुळेच हे तीन देश चीनवर दबाव आणत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com