
Mumbai Accident : मुंबईत विचित्र अपघात; रिक्षावर कोसळला लोखंडी खांब, महिलेचा मृत्यू
मुंबईः मुंबईमध्ये आज एक विचित्र अपघात घडला आहे. बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीमधून एक लोखंडी खांब रिक्षावर कोसळला. त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील जोगेश्वरी परिसरात ही घटना घडली. एका इमारतीचं बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या बाजूने एक रिक्षा जात होता. अचानक इमारतीमधून एक लोखंडी खांब रिक्षावर कोसळला. या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली.
जखमी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. 'एएनआय'ने याबाबचे वृत्त दिले आहे. पुढील तपास मुंबई पोलिस करीत आहे. अशा दुर्दैवी अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मुंबई पोलिस तपास करत असून निर्माणाधीन इमारतीची माहिती काढत आहेत. कुणाच्यातरी बेजबाबदारपणामुळे महिलेला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त होतोय.