लादेनच्या मुलाला शोधा, 1 दशलक्ष डॉलर मिळवा : अमेरिका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 मार्च 2019

नवी दिल्ली : अल् कायदाचा म्हेरक्या ओसामा बिन लादेन याचा आमेरिकेने खात्मा केल्यानंतर आता त्याचा मुलगा अमेरिकेची डोकेदुखी ठरू लागलाय. लादेनचा मुलगा हामजा हा आता अल् कायदाचा म्होरक्या असून त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हामजा नियोजन करत आहे अशी माहिती आहे. त्याने कोणत्याही प्रकारचा कट यशस्वी करण्याआधीच अमेरिकेला त्याला पकडायचे आहे. त्यामुळे अमेरिकेने त्याला शोधणाऱ्याला 1 दशलक्ष डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे.

अल् कायदा संघटनेने गेले काही दिवस कोणत्याही दहशतवादी कारवाया केलेल्या नाहीत. पण याचा अर्थ ते कायमचे शांत राहतील असे नाही. आम्हाला आता कोणतीही चूक करायची नाही. अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी त्यांच्याकडे कारणे आहेत व त्यांची तितकी क्षमता देखी आहे, त्यामुळे हामजाने कोणतीही कारवाई करण्याआधी आम्हाला त्याला पकडायचे असे अमेरिकेचे अधिकारी नॉथन सेल्स यांनी सांगितले. 

ओसामा बिन लादेनने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करून ट्विन्स टॉवर उध्वस्त केले होते. त्यानंतर अमेरिकेने थेट पाकिस्तानात घुसून आबोटाबादमधील त्याच्या घरावर हल्ला करून त्याला ठार केले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America declares 1 million dollar for arrests son of osama bin laden