दुसऱ्या दिवशी अमेरिकेचा इराकवर एअरस्ट्राईक; ६ जणांचा मृत्यू

Untitled-2.jpg
Untitled-2.jpg

बगदाद : सलग दुसऱ्या दिवशीही अमेरिकेनं इराकवर एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. या हवाई हल्ल्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी बगदादजवळील ताजी रोजनजीक हा अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. काल केलेल्या हल्यात कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता.

या हवाई हल्ल्यात दोन गाड्यांवर निशाणा साधण्यात आला. या गाड्यांमध्ये इराण समर्थक मिलिशिया हश्‍द अल-शाबीचे काही लोक असल्याचं म्हटलं जात आहे. या गाडीत असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप त्यांची ओळख पटली नाही, असं इराक सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेनं हा हल्ला हशद-अल-साबीच्या कमांडरला लक्ष्य करून केला होता. इराकमधील सरकारी माध्यमांनीदेखील या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हशद-अल-साबीचं खंडन
हशद-अल-साबीला ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स’ (PMF) म्हणूनही ओखळलं जातं. याच्याच ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. परंतु या ताफ्यात कोणताही सिनिअर कमांडर नव्हता. या हल्ल्यात काही डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती या संघटनेकडून देण्यात आली.

या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये डॉक्टरांचाही समावेश असल्याची माहिती अल जझिरा वाहिनीकडून देण्यात आली. तर या घटनेत अन्य तीन जण गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहितीही समोर आली आहे. हा हल्ला ज्या ठिकाणी करण्यात आला त्या ठिकाणाहून काही अंतरावरच इटली आणि ब्रिटनच्या सैन्याचे तळ आहेत.

तणावाची शक्यता
गेल्या वर्षापासून अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणाव आहे. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध आणले आहेत. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमेरिकेने हा हल्ला अशावेळी केला आहे जेव्हा बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता.

ट्रम्प यांना दिली होती धमकी...
कासिम सुलेमानी यांना डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोधक मानलं जायचं. त्यांनी अनेकवेळा अमेरिकेला धमकी दिली होती. बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी इशारा देत इराणला नुकसान सहन करावं लागेल असं म्हटलं होतं. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतरच अमेरिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळेच आधीपासूनच तणावपूर्ण संबंध असणाऱ्या अमेरिका आणि इराणधील संबंध अजून बिघडणार हे नक्की मानलं जात आहे.

कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर आयातुल्ला खोमेनी यांनी काही टि्वटस केले आहेत. सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहताना अमेरिकेला त्यांनी इशारा दिला आहे. “इतकी वर्ष त्यांनी अथक मेहनत घेतली. शहीद होणे हा एक पुरस्कार आहे” असे खोमेनी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. खोमेनी यांनी देशामध्ये तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com