वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून ‘युद्ध मंत्रालय’ असे केले आहे. यासंदर्भातील कार्यकारी आदेश त्यांनी शुक्रवारी काढला आहे, अशी माहिती व्हाइट हाउसने दिली..दुसऱ्या महायुद्धानंतर १५० वर्षांपासून काही काळापर्यंत वापरले जाणारे हे नाव सशस्त्र दलांच्या ध्येयाला अनुसरून बदलण्याची प्रतिज्ञा ट्रम्प यांनी पूर्ण केली आहे, असे ‘व्हाइट हाऊस’ने म्हटले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैन्याची रचना बदलून ती त्यांच्या उद्दिष्टांशी सुसंगत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने युद्धक्षमतेचे प्रदर्शन करून अधिक आक्रमक प्रतिमा निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे..माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कार्यकाळात सैन्याला मनोबल आणि ध्येय खालावले होते, असा आरोप ट्रम्प आणि संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी केला आहे. त्याच्या उलट ट्रम्प यांनी सैन्याची ताकद दाखविण्यावर भर दिला आहे. बायडेन यांनी जागतिक संघर्षांमध्ये देशाची भूमिका वारंवार मांडली, ती पुरेशी नव्हती, असे त्यांचे त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाचे नामकरण करण्याचा निर्णय अपेक्षित होता.‘संरक्षण विभागाच्या नामकरणाची कल्पना ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये ओव्हल ऑफिसमध्ये मांडली होती. त्याआधी एक महिना त्यांनी हेगसेथ यांचा उल्लेख त्यांचे ‘युद्ध मंत्री’ असा केला होता..ट्रम्प यांचे विचार‘युद्ध मंत्रालय’ हे नाव जास्त चांगले वाटते. ते पुन्हा स्वीकारण्याची आवश्यकता आहेसंरक्षण विभागाचे नाव बदलल्यास पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने याच जुन्या नावाने मिळविलेल्या विजयाचे स्मरण होईल‘युद्ध मंत्रालय’ने मिळविलेला विजय हा आपला देदीप्यमान इतिहास आहे.‘संरक्षण’ हे खूप बचावात्मक वाटते. आपण बचावात्मक राहू इच्छितो, पण गरज पडल्यास आक्रमकही होण्याची तयारी ठेवली पाहिजे..नावाचा इतिहासअमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या कार्यकाळात १७८९ मध्ये घटनेची मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत अमेरिकी काँग्रेसने युद्ध मंत्रालयाचा स्थापना केली होती. नव्याने स्थापन झालेल्या देशाच्या सैन्यदलांचे नियंत्रण आणि देखरेख हा विभाग करीत होता. सुमारे १५० वर्षे हे नाव कायम राहिले. त्या काळात अमेरिकेने ब्रिटन, स्पेन, मेक्सिको आणि फिलिपिन्सविरुद्ध युद्धे केली. तसेच यादवी युद्ध आणि स्थानिक अमेरिकन जमातींविरुद्ध लढा दिला होता. तत्कालीन अध्यक्ष हॅरी एस. ट्रुमन यांनी १९४७ मध्ये स्वाक्षरी केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा एक भाग म्हणून या मंत्रालयाचे नाव ‘नॅशनल मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट’ असे केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यात दुरुस्ती केली आणि ‘नॅशनल मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट’चे नाव बदलून ‘संरक्षण मंत्रालय’ (डिफेन्स डिपार्टमेंट) करण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.