अमेरिकेला वास्तवाचे भान; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे निरीक्षण

हिंद-प्रशांत क्षेत्रातील बदलणारे राजकारण या विषयावर झालेल्या चर्चासत्रात जयशंकर यांनी त्यांचे मत मांडले.
परराष्ट्र मंत्री जयशंकर
परराष्ट्र मंत्री जयशंकर Sakal

अबुधाबी : सत्तेचा बढेजाव मिरवण्याचे प्रकार अमेरिकेने २००८ पासून प्रयत्नपूर्वक कमी केले असून त्यांना वास्तवाचे अधिक भान येत आहे, असे निरीक्षण परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल (ता. ४) नोंदविले. हिंद-प्रशांत क्षेत्रातील बदलणारे राजकारण या विषयावर झालेल्या चर्चासत्रात जयशंकर यांनी त्यांचे मत मांडले. पाचव्या हिंद प्रशांत परिषदेला कालपासून सुरुवात झाली. उद्‌घाटनाच्या सत्रात बोलताना जयशंकर यांनी अमेरिकेच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेतला.

ते म्हणाले की,‘‘अमेरिकेने २००८ पासून सत्तेचा बढेजाव मिरवणे कमी केले असून सामर्थ्याबाबतची अतिशयोक्ती करताना विशेष सावधगिरी बाळगली जात आहे. त्यांनी कदाचित दुसऱ्या पद्धतीने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु केले असतील. मात्र, २००८ नंतरच्या सर्व अध्यक्षांनी हेच धोरण कायम ठेवले आहे. त्यांचे विविध निर्णय, जागतिक घटनांमध्ये त्यांनी घेतलेले पुढाकार, त्यांचा सहभाग याचा अभ्यास केला असता हे सिद्ध होते. हे सर्व पाहता ते स्वत:च्या बाबतीत आणि जगाबाबतीतही वास्तवाच्या दिशेने जात आहेत, असे दिसून येते.’’

परराष्ट्र मंत्री जयशंकर
मुंबई : मद्य विक्रेते व्हिस्की स्कॉचच्या नवीन दराचा प्रतीक्षेत

नाहयान यांची घेतली भेट

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अबुधाबीचे युवराज महंमद बिन झायेद अल नाहयान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांची भेट घेतली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील द्वीपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘युएई’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जयशंकर यांनी दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छाही दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com