अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी बार्बरा बुश यांचे निधन

पीटीआय
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मृत्यूपूर्वीच प्रसिद्ध झाली बातमी 
 

दरम्यान, बार्बरा यांचे रविवारी निधन झाल्याची चुकीची बातमी अमेरिकेतील सीबीएस न्यूज या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली होती. मात्र, काही वेळातच ही बातमी काढून टाकण्यात आली. 

ह्युस्टन : अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी बार्बरा बुश (वय 92) यांचे मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. बार्बरा यांची साक्षरतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणूनही ओळख प्राप्त झाली होती. 

बार्बरा यांनी अखेरचा श्वास घेतला त्या वेळी त्यांचे पती व अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच. डब्लू. बूश आणि त्यांचे पुत्र माजी अध्यक्ष जॉर्ज वॉकर बूश यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते, असे या संदर्भातील अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

""माझ्या मातुःश्री बार्बरा यांनी अखेरपर्यंत आमच्या कुटुंबीयांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासारखी आई मला लाभली हे मी माझे भाग्य समजतो,'' अशा शब्दांत जॉर्ज वॉकर बूश यांनी आदरांजली व्यक्त केली. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मलेना यांनीही बार्बरा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ट्रम्प यांनी आपल्या शोकसंदेशात बार्बरा यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America Former First Lady Barbara Bush Died