esakal | चांगली बातमी! कोरोनावरील लस निर्मितीसाठी अमेरिकेने खजिना केला खुला
sakal

बोलून बातमी शोधा

america gave big amount to corona virus vacine producing firm

अमेरिकेने कोरोना विषाणूवर लस तयार करण्याच्या कामात गुंतलेली  बायोटेक कंपनी नोवावैक्सला तब्बल 1.6 अरब डॉलरची मदत देऊ केली आहे. ऑपरेशन वार्प स्पीड या योजनेनुसार देण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.

चांगली बातमी! कोरोनावरील लस निर्मितीसाठी अमेरिकेने खजिना केला खुला

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन- अमेरिकेने कोरोना विषाणूवर लस तयार करण्याच्या कामात गुंतलेली  बायोटेक कंपनी नोवावैक्सला तब्बल 1.6 अरब डॉलरची मदत देऊ केली आहे. ऑपरेशन वार्प स्पीड या योजनेनुसार देण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. यासोबत कोविड-19 चा उपचार आणि विषाणूचा प्रसार रोखणे यासाठी रेजिनरॉन कंपनीला मोठी रक्कम दिली जाणार आहे. 

गृहमंत्र्यांना केले असे व्टिट की थेट वीस जणांवर गुन्हा
अमेरिका आरोग्य विभाग, ह्युमन सर्विस आणि सुरक्षा विभाग यांच्यासोबत झालेल्या करारानुसार नोवावैक्स कंपनीने 2020 च्या शेवटापर्यंत 10 कोटी लस उपलब्ध करुन देण्याचं मान्य केलं आहे. देशातील लोकांना महत्वपूर्ण सुरक्षा पुरवण्यासाठी आम्ही असाधारण प्रयत्न करत आहोत. आम्ही तत्परतेने लस निर्मितीचा कार्यक्रम पुढे घेऊन जात आहोत. ऑपरेशन वार्प स्पीडचा एक भाग झाल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं नोवावैक्स कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टेनली एर्क म्हणाले आहेत. लस निमिर्तीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणला NVX-COV2237 असं नाव देण्यात आलं आहे. 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत हे परीक्षण पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. 

अमेरिकेकडून नोवावैक्य कंपनीला दिली जाणारी रक्कम ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाच्या लस निर्मितीला देण्यात आलेल्या 1.2 अरब डॉलरपेक्षा अधिक आहे. एस्ट्राजेनेकाद्वारे ही लस तयार केली जात आहे. ऑपरेशन वार्प स्पीडनुसार 2021 मध्ये कोविड-19 वरील सुरक्षित आणि प्रभावी लसीचे लाखो डोस तयार करण्याचे अमेरिकेचे लक्ष्य आहे. ऑपरेशन वार्प स्पीड ही एक सार्वजनिक-खासगी भागीदारी आहे. अमेरिकेत कोविड-10 ची लस निर्मिती आणि त्याचे वितरण सोयीस्कर करण्यासाठी याची सुरवात करण्यात आली आहे.

अकोल्यात सरासरी एक कोरोना बळी, तीन महिन्यांत 90 मृत्यू
दरम्यान, अमेरिकेत कोरोना महासाथीने अक्षरश: थैमान घातले आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 33 हजारांपेक्षाही अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला हाताळण्यात ट्रम्प यांना अपयश आल्याचा आरोप होऊ लागला आहे. अशात अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी लस तयार व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. याचाच भाग म्हणून कोरोना विषाणूवर लस निर्माण करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेल्या कंपन्यांना त्यांनी मोठी मदत देणे सुरु केले आहे.