PM मोदी-शहांविरोधातील खटला अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळला

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

टेक्सासच्या ह्यूस्टनमध्ये 19 सप्टेंबर 2019 रोजी आयोजित  'हाउडी मोदी' कार्यक्रमानंतर हा खटला दाखल करण्यात आला होता. यात भारत सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा घेतलेल्या निर्णयाला चॅलेंज देण्यात आले होते.

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला खटला अमेरिकेतील एका न्यायालयाने फेटाळला आहे. फुटीरवादी काश्मीर-खलिस्तान गटासह दोघांनी मोदी आणि शहा यांच्या विरोधात अमेरिकेतील न्यायालयात 10 कोटी डॉलरचा खटला दाखल केला होता. याचिका दाखल करणारा सातत्याने दोन तारखेला अनुपस्थितीत राहिल्यानंतर न्यायालयाने खटला रद्द करण्याचा निर्णय घेतला.  

टेक्सासच्या ह्यूस्टनमध्ये 19 सप्टेंबर 2019 रोजी आयोजित  'हाउडी मोदी' कार्यक्रमानंतर हा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात भारत सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला चॅलेंज दिले होते. याचिकाकर्त्यांनी मोदी, शहा आणि लेफ्टिनंट जनरल कंवल जीतसिंह ढिल्लो यांच्याकडे नुकसान भरपाईच्या स्वरुपात 10 कोटी डॉलर इतकी रक्कमेचा दावा केला होता.  ढिल्लाँ हे सध्याचे डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे महानिर्देशक आणि संरक्षण प्रमुखांसाठी (चीफ ऑफ डिफेन्स) 'इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ'चे उप-प्रमुख आहेत. 

53 वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडे येणार

अमेरिकेच्या दक्षिणी टेक्सास जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश फ्रांसेस एच स्टेसी यांनी 6 डिसेंबरला दिलेल्या आदेशानुसार, काश्मीरमधील खिलस्तान रेफरेंडम फ्रंटने दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीला उपस्थिती लावलेली नाही. या प्रकरणातील सुनावणीला हजर राहण्यासाठी त्यांना दोन वेळा तारखा देण्यात आल्या होत्या. दोन्ही वेळेस सुनावणीला हजर न राहिल्यामुळे खटला रद्द करण्यात आला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america khalistani us lawsuit against prime minister narendra modi and amit shah dismissed