America : अमेरिकेत पुन्हा गोळीबार; 3 ठार, एक जवानासह हल्लेखोर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

American Soldier

अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी उघड गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत.

America : अमेरिकेत पुन्हा गोळीबार; 3 ठार, एक जवानासह हल्लेखोर जखमी

अमेरिकेत (America) वेगवेगळ्या ठिकाणी उघड गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत, यात निष्पाप लोक मारले जात आहेत. याच क्रमानं अमेरिकेतील स्मिथबर्गमधील मेरीलँड शहरात (Maryland City) गोळीबार झाला असून यात तीन जणांचा मृत्यू झालाय.

उत्तर मेरीलँडमधील एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटवर गुरुवारी एका बंदुकधारी व्यक्तीनं गोळीबार केला. ज्यात किमान तीन जण ठार झाले आणि अन्य काहीजण गंभीर जखमी झाले, अशी बातमी एएनआयनं मेरीलँड सरकारच्या हवाल्यानं दिलीय. वॉशिंग्टन काउंटी शेरीफच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, मेरीलँड सैनिकांसोबत झालेल्या गोळीबारात जखमी झाल्यानंतर हल्लेखोराची ओळख पटली नाहीय, सध्या त्याला ताब्यात घेण्यात आलंय.

हेही वाचा: राष्ट्रपती कसा निवडला जातो, खासदार-आमदारांच्या मताची किंमत काय?

गोळी झाडल्यानंतर संशयित हल्लेखोर आणि जवान दोघांनाही स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलंय. वॉशिंग्टन काउंटी शेरीफ कार्यालयानं सांगितलं की, बिकल रोडच्या 12900 ब्लॉकजवळ गुरुवारी दुपारी 2:30 वाजता गोळीबार झाला. शिवाय, न्यूयॉर्क, टेक्साससह अनेक भागात गोळीबार करण्यात आला असून निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान, अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये शनिवारी रात्री उशिरा एका बंदूकधाऱ्यानं जमावावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत आतापर्यंत किमान 3 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Web Title: America Maryland City Smithsberg Open Firing Three People Died And One Soldier Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :americaterrorist attack
go to top