esakal | मास्क न घातल्यास अमेरिकेत दुप्पट दंड
sakal

बोलून बातमी शोधा

mask

मास्क न घातल्यास अमेरिकेत दुप्पट दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : विमान, रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना मास्क न घातल्यास आकारली जाणारी दंडाची रक्कम अमेरिकेने आता दुप्पट केली.

कोरोना संसर्गाची साथ असतानाही नागरिकांचे नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, मास्क न घालता प्रवास केल्यास आता ५०० ऐवजी एक हजार डॉलरचा दंडा केला जाणार आहे.

तसेच, त्याच व्यक्तीला दुसऱ्यांना विनामास्क पकडल्यास तीन हजार दंड ठोठावला जाणार आहे. ‘तुम्ही नियम मोडत असाल, तर दंड भरण्याचीही तयारी ठेवा,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे.

loading image
go to top