Gun Firing: मेक्सिको शहरात अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार; हल्ल्यात 18 जण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gun Firing: मेक्सिको शहरात अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार; हल्ल्यात 18 जण ठार

Gun Firing: मेक्सिको शहरात अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार; हल्ल्यात 18 जण ठार

अमेरिकेच्या मेक्सिकन सिटीमधून मोठी घटना घडली आहे. मेक्सिको येथील सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला असून त्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये तेथील महापौरांचाही समावेश आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मेक्सिकन सिटी हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हॉलमध्ये प्रवेश केला, काही वेळ थांबून त्याने अचानक अंदाधुंद गोळीबार करायला सुरवात केली. या गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाला. गोळीबारात महापौरांव्यतिरिक्त त्यांचे वडील, माजी महापौर आणि महापालिका अधिकारी तसेच पोलिसांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :americafire