अमेरिकेत सर्वात मोठी दुर्घटना; इमारतीला लागलेल्या आगीत 8 मुलांसह 12 जणांचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Philadelphia Fire News

या घटनेत आणखी जीवितहानी झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.

America : इमारतीला लागलेल्या आगीत 8 मुलांसह 12 जणांचा होरपळून मृत्यू

US Philadelphia House Fire : अमेरिकेतील (America) फिलाडेल्फिया येथे दोन मजली इमारतीला लागलेल्या आगीत आठ मुलांसह 12 जणांचा मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या (America Fire Brigade) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन जणांना रुग्णालयात पाठवण्यात आलं असून इतर पीडितांचा शोध सुरू आहे. या घटनेत आणखी जीवितहानी झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय. या घरात 26 लोक राहत होते. Philadelphia Fire News

बुधवारी पहाटे लागलेल्या आगीचं कारण अद्यापही समजू शकलं नसून, शहरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. या आगीमुळं आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झालाय. अधिकार्‍यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांची नावं, वय दिलेली नाहीत. सकाळी 6.30 च्या आधी ही आग लागली. या आगीतून आठ जणांना बचावण्यात यशस्वी आल्याचं समजतंय. या कुटुंबातील दोघांची फेसबुकवरून ओळख पटवलीय. रोजली मॅकडोनाल्ड (३३) आणि व्हर्जिनिया थॉमस (३०) अशी या दोन बहिणींची नावं आहेत.

हेही वाचा: मुकेश अंबानींनी 800 रुपयांत काम करणाऱ्या नीताशी का केलं लग्न?

या दोन बहिणींना अनेक मुलं आहेत. मात्र, या आगीदरम्यान तिथं किती मुलं उपस्थित होती किंवा त्यांची किती मुलं मरण पावली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन अधिकार्‍यांनी यापूर्वी सांगितलं होतं, की या घटनेत सात मुलांसह 13 लोकांचा मृत्यू झाला होता, परंतु बुधवारी संध्याकाळी त्यांनी सांगितलं, की मृतांमध्ये आठ मुलं आणि चार प्रौढांचा समावेश आहे. एका मुलाला घरातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश आलं, पण नंतर त्याचाही मृत्यू झाला. शहराच्या वायव्येला असलेल्या फेअरमाऊंट परिसरात ही घटना घडलीय. फिलाडेल्फिया म्युझियम ऑफ आर्ट (Philadelphia Museum of Art) देखील इथं आहे.

हेही वाचा: 'संरक्षणासाठी कावळ्यासह जंगली पक्ष्यांना गोळ्या घालता येणार'

अग्निशमन विभागाचे क्रेग मर्फी म्हणाले, हा आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे. मी माझ्या आयुष्यात असा अपघात कधीच पाहिला नव्हता. शहराचे महापौर जिम केनी म्हणाले, या घटनेत इतक्या मुलांचा जीव गमवावा लागणं दु:खदायक आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि फर्स्ट लेडी जिल बायडन (Jill Biden) यांनी म्हंटलंय की, माझा या जागेशी जवळचा संबंध आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना जिल यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, की फिलाडेल्फियामध्ये लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करते, असं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: Muslim Girls : मुस्लीम मुलींच्या हिजाबविरुध्द विद्यार्थी आक्रमक

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top